Pune News : देशातील बाजारात दिवाळीनंतर सोयाबीनची आवक शिगेला पोचली. महत्वाच्या बाजारांमधील आवक उच्चांकी पातळीवर आहे. मात्र सोयाबीनला भाव मिळत नाही. दुसरीकडे कापूसही कमी भावात जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी गोची झाली. शेतकऱ्यांवर कमी भावात सोयाबीन विक्रीची वेळ आली.
देशात यंदा सोयाबीनची लागवड २ ते ३ आठवड्यांनी उशीरा झाली. त्यामुळे काढणीही काहिशी उशीरा झाली. यामुळे बाजारात सोयाबीनची आवक वाढण्याला काहिसा उशार झाला. त्यातही दिवाळीमुळे बाजार समित्या बंद राहणार होत्या. वाढणीच्या काळात झालेल्या पावसानेही पिकाचे नुकसा झाले. सोयाबीनमध्ये ओलावा जास्त आला. परिणामी दिवाळीत शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री काहिशी कमी केली होती. या काळात शेतकऱ्यांनी सोयाबीन वाळवण्याला प्राधान्य दिले होते.
दिवाळीनंतर मात्र बाजारातील सोयाबीनची आवक वाढण्यास सुरुवात झाली. सध्या सोयाबीनची आवक शिगेला पोचली आहे. देशातील महत्वाच्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. मध्य प्रदेशातील इंदोर, निमच, देवास, बाडनगर, उज्जैन आदी बाजारात सोयाबीनची आवक उचांकी पातळीवर पोचत आहे. या बाजारांमध्ये रोज १० हजार क्विंटलपेक्षा जास्तची आवक होत आहे.
राज्यात आवक शिगेला
राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनची आवक शिगेला पोचली. लातूर, वाशीम, अमरावती, जालना आणि हिंगणघाट बाजारात आवक जास्त होत आहे. लातूर बाजारातील आवक आता ३० हजार क्विंटलच्या घरात पोचली. इतर बाजारांमध्ये आवक १० हजार क्विंटलच्या दरम्यान आहे. तसेच सोयाबीनमधील ओलावाही काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे बाजारातील आवक वाढत आहे.
आवक आणखी वाढण्याचा अंदाज
सोयाबीनची काढणी झाल्यानंतर राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. त्यामुळे बाजारातील व्यवहारही काही प्रमाणात थंडावले होते. मात्र आता निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. त्यामुळे पुढील २ दिवसांमध्ये राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीनची आवक वाढण्याचा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.