Soybean MSP : हिंगोलीत सोयाबीनला हमीभावापेक्षा ५२२ ते १००२ रुपयांनी कमी दर

Soybean Market Rates : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात मंगळवारी (ता. १९) सोयाबीनला हमीभावापेक्षा (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) क्विंटल मागे ५२२ ते १००२ रुपये कमी दर मिळाले.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात मंगळवारी (ता. १९) सोयाबीनला हमीभावापेक्षा (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) क्विंटल मागे ५२२ ते १००२ रुपये कमी दर मिळाले. धान्य बाजारात मंगळवारी (ता. १९) सोयाबीनची ७०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३८९० ते कमाल ४३७० रुपये, तर सरासरी ४१३० रुपये दर मिळाले.

सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी अडचणी येत आहेत. शिवाय शासकीय खरेदीचे चुकारे मिळण्यास विलंब लागतो. तातडीच्या आर्थिक गरजा असलेले शेतकरी बाजार समितींमध्ये सोयाबीनची विक्री करत आहेत.

Soybean Market
Soybean Rate : ओलाव्याचा टक्का वाढला तरी भाव ‘जैसे थे’च

परंतु ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याच्या कारणांमुळे व्यापारी भाव पाडून सोयाबीनची खरेदी करत आहेत. हमीभाव आणि बाजारभाव यांच्यात क्विंटलमागे ५०० ते १००० रुपयांची तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हिंगोली धान्य बाजारात सोमवारी (ता. १८) सोयाबीनची ९४० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३८८० ते कमाल ४४०० रुपये, तर सरासरी ४१४० रुपये दर मिळाले.

Soybean Market
Soybean Market : सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

शनिवारी (ता. १६) सोयाबीनची १४५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३८७५ ते कमाल ४४४५ रुपये, तर सरासरी ४१६० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १४) सोयाबीनची १४२० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३७८० ते कमाल ४३०० रुपये, तर सरासरी ४०४० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. १३) सोयाबीनची १४०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३६५० ते कमाल ४१५० रुपये, तर सरासरी ३९०० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. १२) सोयाबीनची १६८० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३९८० ते कमाल ४५५० रुपये, तर सरासरी ४२६५ रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com