Kharif Sowing : सोयाबीनच्या ९ हजार, तर कपाशी क्षेत्रात ५ हजार हेक्टरने वाढ

Soybean Sowing : सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ४९ हजार ७२७ हेक्टर असताना यंदा २ लाख ८० हजार ९०५ हेक्टरवर (११२.४८ टक्के) पेरणी झाली आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : या वर्षीच्या (२०२४) खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात ५ लाख २७ हजार ९१० हेक्टरवर (९८.६९ टक्के) पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या (२०२३) तुलनेत यंदा एकूण पेरणीत १० हजार ६०२ हेक्टरने, तर सोयाबीनच्या पेरणीत ९ हजार ७८१ हेक्टरने, तर कपाशीच्या लागवडीत ५ हजार ४६४ हेक्टरने वाढ झाली आहे. मूग, उडीद, ज्वारी, बाजरीचे पेरणी क्षेत्रातील घट यंदाही कायम आहे.

कृषी आणि महसूल विभागाकडून शुक्रवारी (ता. ३०) यंदाच्या खरिपाचे अंतिम पेरणी क्षेत्र निश्‍चित करण्यात आले, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्राधिकारी (सांख्यिकी) महादेव लोंढे यांनी दिली.सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ४९ हजार ७२७ हेक्टर असताना यंदा २ लाख ८० हजार ९०५ हेक्टरवर (११२.४८ टक्के) पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : सोयाबीन, मक्याला सर्वाधिक पसंती

सर्व तालुक्यात सोयाबीनची सरासरीहून अधिक पेरणी झाली. कपाशीचे सरासरी क्षेत्र असताना १ लाख ९२ हजार २१३ हेक्टर असताना यंदा १ लाख ९७ हजार ९८६ हेक्टरवर (१०३ टक्के) लागवड झाली आहे. सेलू, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम तालुक्यात कपाशीची सरासरीपेक्षा जास्त लागवड झाली. तुरीची ४५ हजार ९५९ पैकी ३९ हजार ६५ हेक्टरवर (८५ टक्के), मुगाची २७ हजार १७८ पैकी ६ हजार ८३ हेक्टरवर (२२.३८ टक्के), उडदाची ९ हजार ८० पैकी १ हजार ७२३ हेक्टरवर (१८.९८ टक्के) पेरणी झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत तुरीच्या पेरणीत २ हजार ६५ हेक्टरने, मुगाच्या पेरणीत २ हजार ४६६ हेक्टरने, तर उडदाच्या पेरणीत २ हजार ८० हेक्टरने घट झाली. ज्वारीची ७ हजार ३३३ पैकी १ हजार ७८ हेक्टरवर (१४.७१ टक्के), बाजरीची १ हजार १६७ पैकी १८९ हेक्टरवर (१६.२० टक्के), मक्याची १ हजार ३ पैकी ४७० हेक्टरवर (४६.८२ टक्के) पेरणी झाली आहे. गतवर्षीपेक्षा ज्वारीच्या पेरणीत १ हजार १५० हेक्टरने, तर बाजरीच्या पेरणीत ३३९ हेक्टरने घट झाली. यंदा तृणधान्यांची ९ हजार ८३१ पैकी १ हजार ९३० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Sunflower Sowing : सूर्यफूल पेरा वाढणार; बियाणे मुबलक देण्याची मागणी

खरीप २०२४ तालुकानिहाय अंतिम पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ९७००० ९३६५९ ९६.५६

जिंतूर ९७८८४ ९३९४५ ९५.९७

सेलू ६०५३२ ६२७४३ १०३.६५

मानवत ४२५९९ ४३५२५ १०२.१७

पाथरी ४४९५० ४३४७९ ९६.७३

सोनपेठ ३५०३२ ३४९०५ ९९.६४

गंगाखेड ५७८०७ ५८४१२ १०१.०५

पालम ४५६१६ ४५९४० १००.७१

पूर्णा ५३४७६ ५१२९२ ९५.९२

पीकनिहाय तुलनात्मक पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक २०२३ पेरणी २०२४ पेरणी

सोयाबीन २७११२४ २८०९०५

कपाशी १९२५२२ १९७९८६

तूर ३७००० ३९०६५

मूग ८५४९ ६०८३

उडीद ३८०३ १७२३

ज्वारी २२२८ १०७८

बाजरी ५२८ १८९

मका ८९० ४७०

तीळ १९६ १०८

कारळ ६२ २५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com