Nagpur News: हमीदाराने सोयाबीनसह कडधान्य खरेदीचा अखेर मुहूर्त सापडला आहे. सोमवार (ता. ३) पासून पोर्टलवर नोंदणी तर प्रत्यक्ष १५ नोव्हेंबरपासून खरेदी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यासाठी ‘पणन’ तसेच ‘एनसीसीएफ’अंतर्गत नऊ केंद्रांना हमीदाराने खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे..हमीदाराने सोयाबीनसह कडधान्य खरेदीसाठी केंद्र शासनाने नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. यात राज्यातील काही जिल्हे ‘नाफेड’ला तर काही जिल्हे ‘एनसीसीएफ’ला गेले आहे..Cotton Soybean Procurement: कापूस, सोयाबीन खरेदीच्या गोंधळामुळे शेतकरी अडचणीत.नागपूर जिल्हा ‘एनसीसीएफ’ला गेला आहे. जिल्ह्यात १३ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी पणन महासंघाने प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यातील केवळ ७ केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. तर सहा केंद्र नामंजूर करण्यात आले आहे. या केंद्रावर खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपासून सुरू झाली..मात्र पोर्टल ॲक्टीवेट न झाल्याने ही नोंदणी सोमवारपासून होणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही नोंदणी करता येणार असल्याचे पणन महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. यंदा सोयाबीनचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने अपरिमित नुकसान झाले आहे. खुल्या बाजारात दर हमीदराच्या तुलनेत दबावात आहेत..Soybean MSP Procurement: नोंदणी करताना बायोमेट्रिकचा खोडा.मिळणाऱ्या भावातून उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्य होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्याला दिलासा देण्यासाठी हमीदाराने शासकीय खरेदी सुरू होणे आवश्यक होते. दिवाळीपूर्वी केंद्र सुरू होईल, ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. नोडल एजन्सी नियुक्त करताना केलेली हेळसांड व नियमावलीतील बदल, यामुळे सोयाबीनची खरेदीसाठी जवळपास महिनाभराचा विलंब झाला आहे..१५ नोव्हेंबपासून खरेदीस होणार प्रारंभनोंदणीसाठी सोमवारपासून सुरुवात होत असून ही नोंदणी दोन महिने चालणार आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी १५ नोंव्हेबरपासून होणार आहे. पुढे ९० दिवस फेब्रुवारी १५ पर्यंत ती केली जाणार असल्याचे पणन विभागाच्या वतीने सांगण्यात आले..या केंद्रांना मिळाली मंजुरीजिल्ह्यात सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या नरखेड, काटोल, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यांच्या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनचे तर पारशिवणी तसेच कळमना येथे विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार आहे..सोयाबीन खरेदीसाठी आदेश प्राप्त झाले आहे. मात्र ‘एनसीसीएफ’कडून अद्याप पोर्टल कार्यान्वित झाले नाही. लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.- अजय बिसेन, जिल्हा पणन अधिकारी, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.