Soyabean Oil Price: सोयातेलाच्या भावात ३० टक्क्यांनी वाढ

Soyabean Oil Market Update: मागील सहा महिन्यांत सोयातेलाचे भाव तब्बल ३० टक्क्यांनी वाढले आहेत, मात्र सोयापेंडचे भाव १४ टक्क्यांनी कमी झाले आहेत.
Soyaoil
SoyaoilAgrowon
Published on
Updated on

Pune News: अमेरिकेच्या बायोडिझेल धोरणामुळे सोयातेलाच्या भावात चांगलीच तेजी आली आहे. त्यामुळे दरवाढीत सोने, चांदीलाही यंदा मागे टाकले आहे. मागील सहा महिन्यांत सोयातेलाचे भाव तब्बल ३० टक्क्यांनी वाढले आहेत, मात्र सोयापेंडचे भाव १४ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

अमेरिकेने बायोडिझेल निर्मिती वाढविण्यासाठी धोरणात काही बदल केले. या धोरणानुसार २०२९ पर्यंत बायोडिझेल क्रेडिटला मुदतवाढ देण्यात आली. तसेच अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन, मका आणि कॅनोलाला घरगुती समजून लाभ दिला जाणार आहे. या धोरणामुळे बायोडिझेलसाठी सोयातेलाची मागणी वाढणार आहे. अमेरिकेत सोयातेलाचा वापर २५० दशलक्ष गॅलनने वाढण्याची शक्यता असल्याने सोयातेलाच्या भावात सुधारणा झाली आहे.

Soyaoil
Palm Oil Impact on Soybean : पाम तेलातील तेजी सोयाबीनच्या मुळावर

या पार्श्‍वभूमीवर सोयाबीनचे गाळप वाढणार आहे. मका तसेच कॅनोलाचे गाळपदेखील वाढेल. तसेच मागणी वाढल्याने तेलाचे भाव वाढले आहेत. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत सोयातेलाच्या भावात तब्बल ३० टक्क्यांची वाढ दिसून आली. सोयातेलासाठी सोयाबीन गाळप वाढल्यानंतर सोयापेंडची निर्मितीही वाढत आहे. याचा थेट दबाव पेंडेच्या भावावर होत आहे. पेंडेचे भाव जानेवारी २०२५ पासून १४ टक्क्यांनी कमी झाले. तर जुलै २०२४ आणि जुलै २०२५ मधील दराचा विचार केला तर भाव तब्बल २१ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

दुसरीकडे चीननेही पशुखाद्यात सोयापेंडचा वापर २०३० पर्यंत सध्याच्या १३ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणामही दरावर होऊ शकतो, असे काही संस्थांनी म्हटले आहे.

Soyaoil
Soybean Oil Rate : बांगलादेशात सोयाबीन तेलाच्या दरात प्रतिलिटर आठ टक्क्यांची वाढ

जागतिक पातळीवर यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन उत्पादन काहीसे कमी राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेत मागणी वाढल्यामुळे सोयाबीनच्या दरालाही आधार मिळू शकतो. सध्याच्या पातळीवरील दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अमेरिकेतील काही विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसईए) माहितीनुसार, देशात सोयातेल आयातीचा भाव ११८० डॉलर प्रतिटन आहे. मागील वर्षी याच काळात भाव १०५४ डॉलर होता. सोयापेंडचे भाव ४८९ डॉलरवरून ३९० डॉलर प्रतिटनांपर्यंत कमी झाले आहेत.

सोयापेंडचे काय?

सोयाबीनमध्ये तब्बल ८२ टक्क्यांपर्यंत पेंड असते. सोयापेंडेचे उत्पादन वाढल्यानंतर दरावर याचा दबाव येऊ शकतो. सोयातेलाचे भाव वाढत असले तरी सोयापेंडचे भाव मात्र कमी झाले आहेत. पेंडेच्या दरात सुधारणा होत नाही तोपर्यंत सोयाबीनच्या दरातही चांगली तेजी दिसणार नाही, असे अभ्यासकांनी स्पष्ट केले.

सोयाबीनलाही आधार मिळेल

सोयातेलाचे भाव सध्याच्या ५३ सेंट प्रति पाउंडवरून पुढील हंगामात ६० सेंटच्या दरम्यान पोहोचू शकतात. त्यामुळे सोयाबीनच्या भावाला अमेरिकेत ९ डॉलरचा आधार तयार होऊ शकतो. पुढील हंगामात सोयाबीनचे भाव १२ डॉलरच्या दरम्यान पोहोचू शकतात, असा अंदाज अमेरिकेतील विश्‍लेषकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com