Soybean Variety : सोयाबीनच्या ४४ वाणांची गुणवैशिष्ट्ये अनुभवा एकाच ठिकाणी

Soybean Cultivation : राज्यात कापसानंतर सोयाबीन हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पीक आहे. २०२४-२५ या वर्षातील हंगामात सुमारे ४५ हजार हेक्‍टरवर याची लागवड होती.
Soybean Farming
Soybean Farming Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : शेतकऱ्यांना उत्पादनक्षम वाणाची निवड करणे सुलभ व्हावे याकरिता पुढाकार घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या प्रादेशिक संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी अभिनव अशा कॅफेटेरियाची संकल्पना मांडली आहे. मध्यभारतीसाठी प्रसारित तब्बल ४४ वाणांची लागवड या अंतर्गत करण्यात आली आहे.

राज्यात कापसानंतर सोयाबीन हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पीक आहे. २०२४-२५ या वर्षातील हंगामात सुमारे ४५ हजार हेक्‍टरवर याची लागवड होती. सोयाबीन लागवड क्षेत्रात ५२ हजार हेक्‍टरच्या माध्यमातून मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात या पिकाच्या व्यवस्थापनात सुधारणांवर भर देत त्याद्वारे उत्पादकता वाढीचे प्रयत्न ‘पंदेकृवि’कडून होत आहे.

त्याच प्रयत्नाअंतर्गत विद्यापीठाने अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्राच्या (सोयाबीन) माध्यमातून शेतकऱ्यांना मध्यभारत व महाराष्ट्रासाठी प्रसारित सोयाबीन वाणाच्या गुणवैशिष्ट्यांची माहिती व्हावी याकरिता अभिनव संकल्पना राबविली आहे. ‘सोयाबीन कॅफेटेरिया’ असे याला नाव देण्यात आले आहे.

Soybean Farming
Soybean Sowing Method : सुधारित जोडओळ पद्धतीने करा सोयाबीन पेरणी

याद्वारे मध्यभारत आणि महाराष्ट्रासाठी प्रसारित ४४ वाणांची लागवड एकाच ठिकाणी केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर एका वाणाचे प्रत्येकी दहा तास लावले आहेत. शेतकऱ्यांनी याची पाहणी करीत, निवड करून पुढील हंगामात उत्पादनक्षम वाण लागवड करावी, असे या संकल्पनेत अपेक्षित आहे.

अमरावती संशोधन केंद्रासमवेतच विद्यापीठाचे मुख्यालय असलेल्या अकोला येथील प्रक्षेत्रावर सोयाबीनच्या १५ वाणांची लागवड केली आहे. त्यामध्ये पूर्व प्रसारित दोन वाणांचादेखील समावेश आहे. कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. एस. एस. माने यांच्या मार्गदर्शनात सोयाबीन पैदासकार सतीश निचळ, ब्रीडर प्रवीण पाटील, प्रक्षेत्र अधीक्षक प्रवीण मोहोड यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

Soybean Farming
Soybean Sowing : नांदेड जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी

हे वाण अनुभवता येणार

पीडीकेव्ही अंबा, सुवर्ण सोया, पूर्वा, पीडीकेव्ही यलो गोल्ड, परभणी विद्यापीठाच्या एमएयूएस-६१२, १६२, ७२५, ३११, राहुरी कृषी विद्यापीठाद्वारे विकसित फुले संगम, दुर्वा, किमया तसेच आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांतर्गत इंदूर, जबलपूर, राजपूर, कोटा येथून प्रसारित तब्बल ४४ वाणांची लागवड अमरावती प्रादेशिक संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर केली आहे. या वाणांची गुणवैशिष्ट्ये शेतकऱ्यांना अनुभवता येतील.

राज्यात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. त्यामुळेच या पिकातील विविध वाणांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी याकरिता एकाच ठिकाणी तब्बल ४४ वाणांची लागवड केली आहे. हे वाण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बघता येतील आणि अनुभवता येतील. त्या आधारे निवड पुढील हंगामात वाणांची निवड सोपी होईल.
- सतीश निचळ, सोयाबीन पैदासकार, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com