Summer Sowing : उन्हाळी तृणधान्यांची १५१८ हेक्टरवर पेरणी

Sowing Update : परभणी -हिंगोली जिल्ह्यात कृषी विभागाकडील माहितीनुसार या वर्षीच्या (२०२४) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. ५)पर्यंत तृणधान्यांची १ हजार ५१८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Summer Sowing
Summer SowingAgrowon

Parbhani News : परभणी -हिंगोली जिल्ह्यात कृषी विभागाकडील माहितीनुसार या वर्षीच्या (२०२४) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. ५)पर्यंत तृणधान्यांची १ हजार ५१८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची पेरणी ३९५ हेक्टर, बाजरीची १८९ हेक्टर, मक्याची ९३३ हेक्टर पेरणीचा समावेश आहे. एकूण उन्हाळी पिकांची परभणी जिल्ह्यात ५३२२ हेक्टर (४८.५७ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात ११ हजार ९५९ हेक्टर (४५.३९ टक्के) अशी या दोन जिल्ह्यांत एकूण उन्हाळी पिकांची १७ हजार २८१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांचे सरासरी १० हजार ९५८ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. ५)पर्यंत ५ हजार ३२२ हेक्टरवर (४८.५७ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची १ हजार ४२७ पैकी ९०५ हेक्टर (६३.४० टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीची ५९.५ हेक्टर, बाजरीची ५०.२७ पैकी १८९ हेक्टर, मक्याची १ हजार ३७७ पैकी ६५६ ९ हेक्टर (४७.५४ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांची ४९.०७ पैकी ४ हेक्टर (८.१५ टक्के) पेरणी झाली आहे.

Summer Sowing
Summer Sowing : पाच जिल्ह्यांत अपेक्षित क्षेत्रावर उन्हाळी पेरणी नाही

त्यात मुगाची ३२.४ पैकी ४ हेक्टर (१२.३५ टक्के) पेरणी झाली आहे. एकूण अन्नधान्यांची १ हजार ४७६ पैकी ९०९ हेक्टर (६१.५६ टक्के) पेरणी झाली. गळीत धान्यांची ९ हजार ४८२ पैकी ४ हजार ४१३ हेक्टरवर (४६.५४ टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार ७९६ पैकी ३ हजार २०० हेक्टर (४७.०९ टक्के), सोयाबीनची २ हजार ६६२ पैकी १ हजार २०६ हेक्टर (४५.२९ टक्के), तिळाची ११.२४ पैकी २ हेक्टर (१७.७९ टक्के), तर सूर्यफुलाची ४ हेक्टर (११.२४ टक्के) पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र २६ हजार ३४८ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. ५)पर्यंत ११ हजार ९५९ हेक्टरवर (४५.३९ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची ५ हजार ९६२ पैकी ६१३ हेक्टरवर (१०.२८ टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीची १ हजार ९५ पैकी ३३६ हेक्टर (३०.६८ टक्के), मक्याची १ हजार २ पैकी २७७ हेक्टर (२७.६४ टक्के) पेरणी झाली आहे.

Summer Sowing
Summer Sowing : तीन जिल्ह्यांत १९ हजार ८६७ हेक्टरवर उन्हाळी पेरणी

कडधान्यांची ५ हजार ५३० पैकी ४३४ हेक्टर (७.८५ टक्के) पेरणी झाली. त्यात मुगाची १ हजार ९१२ पैकी २९१ हेक्टर (१५.२१ टक्के), उडदाची ३ हजार ५४८ पैकी १४३ हेक्टर (४.०३ टक्के) पेरणी झाली. एकूण अन्नधान्यांची ११ बदाप ४९२ पैकी १ हजार ४७ हेक्टर (९.११ टक्के) पेरणी झाली. गळीत धान्यांची १४ हजार ८५६ पैकी १० हजार ७०० हेक्टरवर (७२.७३ टक्के) पेरणी झाली. उन्हाळी भुईमुगाचे सरासरी क्षेत्र ६ हजार ४६३.९९ असताना ९ हजार ९५२ हेक्टर (१५३.८७ टक्के) पेरणी झाली. सोयाबीनची ८ हजार ३९२ पैकी ९६० हेक्टर (११.४४ टक्के) पेरणी झाली आहे.

परभणी हिंगोली उन्हाळी तृणधान्ये पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी १०० १४ १४

जिंतूर १२० ८१ ६७.५०

सेलू १२७.५४ ००० ०००

मानवत ११६ ९८ ८४.३९

पाथरी १९६ २२९ ११६.८४

सोनपेठ २४९ १७९ ७१.९२

गंगाखेड १३५ २१ १५.५२

पालम २२२ २१० ९४.४५

पूर्णा १५१ ७३ ४८.२४

हिंगोली ५५३ ३५ ६.३३

कळमनुरी ९१४ ३१६ ३४.५७

वसमत २९०१ ००० ०००

औंढा नागनाथ ५७४ ०० ००

सेनगाव १०१९ २६२ ३५.६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com