Summer Season Sowing : सांगली उन्हाळ हंगामाचा १ हजार ९०० हेक्टरवर पेरा

सांगली जिल्ह्यात उन्हाळ हंगामातील पेरणी आटोपली आहे. उन्हाळ पिकाची पेरणी १९१४ हेक्टर म्हणजे ५४ टक्क्यांवर झाली आहे. उन्हाळ सोयाबीनच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे.
 Sowing
Sowing Agrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यात उन्हाळ हंगामातील पेरणी आटोपली आहे. उन्हाळ पिकाची पेरणी १९१४ हेक्टर म्हणजे ५४ टक्क्यांवर झाली आहे. उन्हाळ सोयाबीनच्या (Soybean) क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे.

जिल्ह्यात उन्हाळ पिकांचे सरासरी क्षेत्र ३ हजार ५१८ हेक्टर आहे. जिल्ह्यात उन्हाळ हंगामात मका, सूर्यफूल आणि भुईमूग पिकांची पेरणी केली जाते.

यंदाच्या उन्हाळ हंगामात शेतकरी मका पिकाकडे वळाले आहेत. जिल्ह्यातील जत, कवठे महांकाळ, आटपाडी, तासगाव तालुक्यांत प्रामुख्याने मका पिकाची लागवड केली जाते.

१ हजार ३६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा आटपाडी तालुक्यात झाला आहे. भुईमूग पिकाचे सरासरी क्षेत्र ६८९ हेक्टर असून ५२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

 Sowing
Summer Crop : पाच हजार ९४० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिके बहरली

या भागात जनावरांच्या चाऱ्यासाठी मक्याचा वापर केला जातो. यामुळे या भागातील शेतकरी मका पिकाकडे वळाले असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मका पिकाचे सरासरी क्षेत्र १ हजार ७१० हेक्टर असून त्यापैकी १ हजार ३६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

आटपाडी तालुक्यात मका पिकाचा सर्वाधिक पेरा झाला आहे. भुईमूग पिकाचे सरासरी क्षेत्र ६८९ हेक्टर असून ५२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून उन्हाळ सोयाबीनचा पेरा वाढला होता. मात्र उन्हाळ सोयाबीन पिकाला रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचा उन्हाळ सोयाबीन पिकाकडे कल कमी झाला आहे. जिल्ह्यात सोयाबीनची अघवी २४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर जिल्ह्यात चारा पिकांची पेरणी ६७३ हेक्टरवर झाली आहे.

उसाची १ लाख २१ हजार हेक्टरवर लागवड

जिल्ह्यात पुढील गाळप हंगामासाठी १ लाख २१ हजार ३१९ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. सध्या ऊस क्षेत्र निश्चितीसाठी कारखानदार कृषी विभाग यांची एकत्रित बैठक होणार असून त्यानंतर जिल्ह्यातील उसाचे अंतिम क्षेत्र निश्चित केले जाणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून उसाचे क्षेत्र वाढत असले तरी यंदाही उसाच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com