
Parbhani News : यावर्षीच्या (२०२४) रब्बी हंगामात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात करडईची १ हजार ८७९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात करडईच्या क्षेत्रातील घट कायम आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यातील करडईची सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे.
परभणी जिल्ह्यात करडईचे सरासरी क्षेत्र ३ हजार ३७१ हेक्टर असून आजवर ९२७ हेक्टरवर (२७.४९ टक्के) पेरणी झाली आहे. जिंतूर, पूर्णा तालुक्यात करईडचा पेरा निरंक आहे. परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पेरणी झाली.
पालम तालुक्यात पेरा वाढला आहे. जवसाची १९९ पैकी ३२ हेक्टर (२६.८९ टक्के) पेरणी झाली. एकूण रब्बी गळीत धान्यांची ३ हजार ६४४ हेक्टर पैकी १ हजार २५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात एकूण रब्बी कडधान्यांचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार २७२ हेक्टर असतांना यंदा १ लाख २७ हजार २१९ हेक्टरवर (११३.३१ टक्के) पेरणी झाली आहे.
एकूण रब्बी तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ हेक्टर पैकी १ लाख ३ हजार ९९७ हेक्टरवर (६७.१५ टक्के) पेरणी झाली. हिंगोली जिल्ह्यात करडईचे सरासरी क्षेत्र २०५ हेक्टर असून यंदा प्रत्यक्षात ९५२ हेक्टरवर (४६२.९२ टक्के) पेरणी झाली आहे.
परभणी-हिंगोली जिल्हे करडई पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) स्रोत कृषी विभाग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.