Rabi Sowing : अहिल्यानगरला साडेतीन लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी

Rabi Season 2024 : अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत आतापर्यंत रब्बीची ३ लाख ४१ हजार ३५२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Rabi Sowing Sangli
Rabi Sowing Sangliagrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत आतापर्यंत रब्बीची ३ लाख ४१ हजार ३५२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक ज्वारीचे १ लाख ४४ हजार ७१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभरा, गव्हाची पेरणीही जोरात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीचे ४ लाख ५८ हजार १४९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा पावसाची व पाण्याची स्थिती चांगली असल्याने रब्बी पेरण्याला वेग येईल असे वाटत होते. मात्र परतीचा पाऊस गेल्यानंतरही मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला.

Rabi Sowing Sangli
Rabi Sowing : नाशिक जिल्ह्यात रब्बी पेरण्यांना येतेय गती

त्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. आतापर्यंत सर्वाधिक ज्वारीची पेरणी झाली आहे. गेल्या दहा वर्षाचा विचार करता पन्नास टक्के ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. यंदा अजून ज्वारीचे क्षेत्र सरासरीच्या पेरणीपेक्षा कमी होते की काय अशी स्थिती आहे.

हरभरा, मका, गव्हाच्या पेरण्या जोरात सुरु आहेत. आता या पेरण्याचाही कालावधी संपत आला आहे. मध्यंतरी वाढलेली थंडी पुन्हा चार-पाच दिवसापाासून कमी झाली आहे. आतापर्यंत ज्वारीची सरासरीच्या ५४ टक्के, गव्हाची ९९.९१ टक्के पेरणी झाली आहे.

Rabi Sowing Sangli
Rabi Sowing : पुणे विभागात ७५ टक्के पेरण्या पूर्ण

मक्याच्या पेरणीने सरासरी ओलांडली असून १८४ टक्के पेरणी झाली आहे. हरभऱ्याची ९१.४९ टक्के झाली आहे. करडई, जवस, तीळ, सूर्यफुलांचे पेरणी क्षेत्र अल्प आहे. रब्बीत होणारी ऊस लागवड यंदा आतापर्यंत ३३ टक्के म्हणजे ३१ हजार ६११ हेक्टरवर झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा रब्बीची स्थिती चांगली आहे. मात्र आता बऱ्याच पिकांचा पेरणी कालावधी संपलेला असल्याने आता फारसी पेरणी क्षेत्र वाढेल अशी असे दिसत नाही. त्यामुळे यंदाही सरासरी एवढी पेरणी होईल की नाही यात शंका आहे. यंदा कांदा लागवडीला मात्र अधिक शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com