Rabi Sowing : रब्बीची ४ हजार ९८७ हेक्टरवर पेरणी

Rabi Season : यंदाच्या (२०२३) रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात ३ हजार ५३ हेक्टर (१.१३ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात १ हजार ९३४ हेक्टर (१.०९ टक्का) अशी दोन जिल्ह्यांत मिळून एकूण ४ हजार ९८७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदाच्या (२०२३) रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात ३ हजार ५३ हेक्टर (१.१३ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात १ हजार ९३४ हेक्टर (१.०९ टक्का) अशी दोन जिल्ह्यांत मिळून एकूण ४ हजार ९८७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आजवरच्या पेरणीमध्ये शेतकऱ्यांनी ज्वारीला प्राधान्य दिले आहे. खरिपाची सुगी सुरू असल्यामुळे अनेक भागांत पेरणी लांबणीवर पडली आहे.

कृषी विभागाकडील माहितीनुसार परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. २७)पर्यंत ३ हजार ५३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात रब्बी ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी १ हजार ६८३ हेक्टरवर (१.४९ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी ९९ हेक्टर (०.२५ टक्का), मक्याची २ हजार ८६ पैकी १ हेक्टर (०.०५ टक्का) पेरणी झाली आहे. हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी १ हजार २१५ हेक्टर (१.०८ टक्का), तर करडईची ३ हजार ३७१ पैकी ५५ हेक्टर (१.६३ टक्का) पेरणी झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : खानदेशात रब्बी हंगामातील पेरणी रखडत

हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. २७) पर्यंत १ हजार ९३४ हेक्टर (१.०९ टक्का) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी २३८ हेक्टर (२.०३ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी ३७५ हेक्टर (०.८८ टक्का) पेरणी झाली. हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी १ हजार २६० हेक्टर (५.३९ टक्के), करडईची २०५ पैकी ३२ हेक्टर (१५.५६ टक्के) पेरणी झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : नगर जिल्ह्यात आतापर्यंत रब्बीची १६ टक्के पेरणी

या दोन जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन काढणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीने अद्याप गती घेतलेली नाही. जमिनीतील ओलावा उडून गेला आहे. त्यामुळे जिरायती क्षेत्रातील पेरणीचे प्रमाण कमी आहे. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी जमीन ओलावून पेरणी करत आहेत. परभणी जिल्ह्यातील पालम, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यातील पेरणी क्षेत्राची अजून नोंद झाली नाही.

तालुकानिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) (शुक्रवार, ता. २७ पर्यंत)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ५७९०० ८०० १.३६

जिंतूर ५३७३० २१० ०.३९

सेलू ३३५६१ २०० ०.६०

मानवत १६११९ १७६ १.०९

पाथरी १७०७२ ५६८ ३.३८

सोनपेठ १५६९८ ३४८ २.२२

गंगाखेड ३२०८६ ४५१ १.४१

पालम २०१३० ०० ००

पूर्णा २२४४९५ ३०० १.२२

हिंगोली ३१०७४ ००० ०००

कळमनुरी ५०१४६ ००० ०००

वसमत ४२०१९ ००० ०००

औंढा नागनाथ २५७२६ ००० ०००

सेनगाव २७९२४ १९३४ ०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com