Rabi Sowing : रब्बी ज्वारीची ९८ हजार ६८९ हेक्टरवर पेरणी

Rabi Season : मॉन्सूनोत्तर पावसामुळे परभणी व हिंगोली जिल्ह्यांत रब्बीच्या पेरणीत वाढ झाली आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : मॉन्सूनोत्तर पावसामुळे परभणी व हिंगोली जिल्ह्यांत रब्बीच्या पेरणीत वाढ झाली आहे. अन्नधान्य तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी या दोन जिल्ह्यांतील जिरायती क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ज्वारीला पसंती दिली आहे.

शुक्रवार (ता. २१) परभणी जिल्ह्यात ८३ हजार ४४० हेक्टर (७३.७८ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात १५ हजार २४९ हेक्टर (१३०.३७ टक्के) अशी दोन जिल्ह्यांत मिळून एकूण ९८ हजार ६८९ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. या दोन जिल्ह्यांत एकूण रब्बीचा ४ लाख १४ हजार ६५३ हेक्टरवर पेरा झाला आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : रब्बीची अपेक्षित पेरणी नाहीच

परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. २१)पर्यंत २ लाख १२ हजार १३ हेक्टरवर (७८.२९ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात रब्बी ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ८३ हजार ४४० हेक्टरवर (७३.७८ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी १३ हजार ८७६ हेक्टर (३५.३० टक्के),

मक्याची २ हजार ६ पैकी ६४७ हेक्टर (३१.०५ टक्के) पेरणी झाली आहे. हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी १ लाख १२ हजार ६२३ हेक्टर (१००.४ टक्के) व सूर्यफुलाची २६.२ पैकी २ हेक्टर (७.६८ टक्के) पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात शुक्रवार (ता. २१) पर्यंत रब्बीच्या सरासरी १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर पैकी २ लाख २ हजार ६४० हेक्टर (११४.५६ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी १५ हजार २४९ हेक्टर (१३०.३७ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी ३२ हजार ८२ हेक्टर (७४.४८ टक्के), मक्याची ९७१ पैकी ६०९ हेक्टर (६२.७२ टक्के) पेरणी झाली.

Rabi Sowing
Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात रब्बीचीपेरणी अंतिम टप्प्यात

हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी १ लाख ५२ हजार ६९७ हेक्टर (१२७.०९ टक्के) पेरणी झाली. मॉन्सूनोत्तर पावसामुळे हरभऱ्यात मोठ्या प्रमाणावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला अनेक शेतकऱ्यांना सुरुवातीला पेरणी केलेला विरळ झालेला हरभरा मोडून टाकावा लागला.

दुबार पेरणीसाठी कमी ओलाव्यावर येणाऱ्या ज्वारीला प्राधान्य दिले. त्यामुळे ज्वारीचा पेऱ्यात वाढ झाली आहे. कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांत ज्वारीचा पेऱ्यात वाढ झाली आहे.

परभणी-हिंगोली जिल्हा ज्वारी पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) (शुक्रवार, ता.२१ पर्यंत)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी २०००० १४०४४ ७०.२२

जिंतूर १५४४६ ९८५० ६३.७७

सेलू १७४०७ .९५५२ ५४.८७

मानवत ७५७१ ६७३६ ८८.९७

पाथरी ९६०४ ७१३७ ७४.३१

सोनपेठ ६८७६ ५७२१ ८३.२०

गंगाखेड १७०७७ १४५०० ८४.९१

पालम १०९३० ८६५८ ७९.२१

पूर्णा ८१७५ ७२४२ ८८.५८

हिंगोली १५३४ ९९४ ६४.७७

कळमनुरी ८३० ९६७ ११६.५१

वसमत ६११२ ७८७० १२८.७८

औंढा नागनाथ २५३१ ४५०० १७७.७७

सेनगाव ६८९ ९१८ १३३.२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com