Sowing Update : राजापूर, संगमेश्वरात धूळफेक पेरण्यांची लगबग

Kharif Season : वाढता उष्मा आणि मे अखेर होत असताना साऱ्यांना मॉन्सूनच्या आगमनाचे वेध लागले असून खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.
Sowing Update
Sowing UpdateAgrowon
Published on: 
Updated on: 

Ratnagiri Sowing News : वाढता उष्मा आणि मे अखेर होत असताना साऱ्यांना मॉन्सूनच्या आगमनाचे वेध लागले असून खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. मशागतीची कामे उरकण्याची लगबग जिल्ह्यात सगळीकडे सुरू आहेत.

मॉन्सूनपुर्वी करण्यात येणाऱ्या धूळफेक पेरण्या राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यात सुरू झाल्या आहेत.

राजापूर तालुक्यात पश्‍चिम किनारपट्टीवरील जैतापूर, सागवे, साखर, कोंबे यांसह आडीवरे, बेनगी, तिठवली, सोलगाव आदी भागांमध्ये शेत नांगरणीसह शेती मशागतीची कामे आणि धूळफेक पेरण्या करण्याची कामे सुरू झाली आहेत. हवामान खात्यासह निसर्गातील बदलातून साऱ्यांना मॉन्सूनच्या आगमनाचे संकेत मिळाले आहेत.

बळीराजा खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. मॉन्सूनपुर्व शेतीच्या मशागतीची कामे करताना खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे आणि खते खरेदी सुरू आहे. मॉन्सूनपुर्व केल्या जात असलेल्या धूळफेक पेरण्यामध्ये शेतकरी गुंतला आहे.

Sowing Update
Kharif Sowing : रोहिणीचा पेरा हुकला; खरिपाच्या प्रारंभीच रसभंग

जैतापूर परिसरासह राजापूर शहरानजीकच्या काही गावांमध्ये धूळफेक पेरण्यांची कामे वेगाने केली जात आहेत. धूळफेक पेरण्यांसाठी लागणारी नांगरणीची कामे सुरू असल्याचे चित्र शेतामध्ये दिसत आहे.

सध्या या धूळफेक पेरण्या अंतिम टप्यामध्ये असून येत्या काही दिवसांमध्ये त्या पूर्णही होणार आहेत. हेच चित्र संगमेश्वर तालुक्यातही आहे. यंदा मॉन्सूनपुर्व पावसाची प्रतीक्षाच आहे. कातळावरील शेतीसाठी लागणारी पेरणी पावसाळ्यापूर्वी होते.

त्यासाठी शेतकरी नांगरणीसह मशागतीची कामेही पावसाळ्यापूर्वी करतात, त्याला धूळफेक पेरण्या म्हणतात.

पाऊस सुरू झाल्यानंतर, कातळ परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होता. त्यामुळे कातळ परिसरात पेरणीसह शेतीच्या मशागतीची कामे करणे मुश्किल होऊन जाते. त्यामुळे मॉन्सूनच्या प्रारंभापुर्वी धूळफेक पेरणी आणि अन्य मशागतीची कामे उरकण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.