Kharif Sowing : वाशीम जिल्ह्यात पेरण्या अंतिम टप्प्यात

Kharif Season : पश्‍चिम विदर्भात वाशीम जिल्हा खरीप लागवडीत सध्या आघाडीवर आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon

Washim News : पश्‍चिम विदर्भात वाशीम जिल्हा खरीप लागवडीत सध्या आघाडीवर आहे. या जिल्ह्यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र लागवडीखाली आलेले असून पावसात खंड पडल्याने पेरणी क्षेत्रावर चिंतेचे ढग तयार झाले आहेत. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी झाल्याने तात्पुरता दिलासा मिळालेला आहे.

या जिल्ह्यात मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पेरणीचा मुहूर्त साधला होता. मृग व आर्द्रा या दोन्ही नक्षत्रांमध्ये पाऊस झाल्याने पेरणीने वेग घेतला होता. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाची पेरणी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर झाली. आतापर्यंतच्या लागवडीत जिल्ह्यात सोयाबीन व तूर या पिकांना शेतकऱ्यांनी पसंती दिल्याचे दिसून आले.

Kharif Sowing
Bajara Sowing : बाजरीचे पेरणी क्षेत्र यंदा घटणार

वाशीम जिल्ह्यात कृषी विभागाकडून ४ लाख ५ हजार ३६० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन झालेले आहे. जिल्ह्यात आजवर आलेल्या पावसाच्या भरवशावर ३ लाख १८ हजार २७१ हेक्टर क्षेत्रावर (७८.५२ टक्के) पेरण्या झाल्या आहेत.

यामध्ये रिसोड तालुक्यात सर्वाधिक ९० टक्के क्षेत्र खरीप पिकांच्या लागवडीखाली आले आहे. दुसरीकडे मानोरा या तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे ६६.३५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खरीप लागवडीचा विचार केला तर प्रामुख्याने तूर, सोयाबीन या आंतरपीक पद्धतीला शेतकऱ्यांनी स्वीकारलेले आहे.

Kharif Sowing
Agriculture Sowing : पाऊस लांबला, पेरण्या खोळंबल्या

सोयाबीनची लागवड दोन लाख ४१ हजार हेक्टरपर्यंत झाली. तर तुरीचे क्षेत्र ५५,८१९ हेक्टर झालेले आहे. जिल्ह्यात कपाशीची लागवड सुद्धा १८,९२८ हेक्टरवर झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या १०० टक्क्यांवर ही पेरणी आटोपलेली आहे. उर्वरित पिकांचे क्षेत्र जेमतेम आहे. यात मूग, ज्वारी, उडीद यांची लागवडही अधिक होऊ शकलेली नाही.

बीबीएफवरील लागवड तरली

जिल्ह्यात अनेक भागांत १५ दिवसांचा खंड पडलेला आहे. चांभई (ता. मंगरूळपीर) येथील शेतकरी दिलीप फुके यांनी बीबीएफच्या साह्याने पीडीकेव्ही अंबा सोयाबीन वाणाची १३ जूनला पेरणी केली होती.

तेव्हापासून शुक्रवार (ता.२८) पर्यंत या परिसरात पाऊस झालेला नाही. तरीही पिकाला या खंडाचा काहीही फरक पडलेला दिसून आलेला नाही. बदलते हवामान व निसर्गाच्या लहरीपणाच्या काळातही पिकासाठी हे तंत्रज्ञान वरदानासारखे धावून आले आहे, असे श्री. फुके यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com