Global Brand : सोनाळा भागातील संत्र्यास जागतिक ब्रँड बनविणार : शेळके

Agro Industry : भविष्यात सोनाळा संत्र्यास जागतिक ब्रँड बनवू,’’ असे प्रतिपादन अभिता ॲग्रो इंडस्ट्रिजचे संस्थापक सुनील शेळके यांनी केले.
Agro Industry
Agro Industry Agrowon

Buldhana News : "संग्रामपुर तालुक्यात सोनाळा परिसर संत्रा बेल्ट म्हणून ओळखला जातो. संत्र्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आली आहे. शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन येथे संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. भविष्यात सोनाळा संत्र्यास जागतिक ब्रँड बनवू,’’ असे प्रतिपादन अभिता ॲग्रो इंडस्ट्रिजचे संस्थापक सुनील शेळके यांनी केले.

‘अभिता’च्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिल्या संत्रा प्रक्रिया उद्योगाचा प्रारंभ रविवारी (ता. १०) करण्यात आला. अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके होते. या वेळी दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके, शिवसेना (उबाठा) गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वाती वाकेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील,

Agro Industry
Orange Processing : तासाला होणार पाच टन सत्र्यांवर प्रक्रिया

महिला ओबीसी आघाडी प्रदेशाध्यक्ष ज्योती ढोकणे, माजी जि. प. उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ आदी उपस्थित होते. शेळके म्हणाले, ‘‘पारंपरिक शेती आता परवडणारी नाही. काळानुरूप शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, फळशेती, फुलशेतीची कास धरावी.

आपण जे पिकवतो त्याचे मार्केटिंग करता आले पाहिजे. सोनाळा, संग्रामपूर परिसर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. शेतकरी संत्र्याचे मुबलक उत्पादन घेतात. मात्र या भागात संत्रा प्रक्रिया उद्योग नव्हता. ही बाब लक्षात घेऊन ‘अभिता’ने संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. संत्रा प्रक्रियेचे आणखी इतर उद्योग सुरू करण्यात येतील.’’

Agro Industry
Orange Farming : आंबिया बहरामध्ये सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

जयश्री शेळके म्हणाल्या, ‘‘दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनद्वारे जिल्ह्यात आर्थिक चळवळ काम करीत आहे. स्वतःचा उद्योग सुरू करून अनेक महिलांनी उन्नती साधली आहे. संत्रा प्रक्रिया उद्योगामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल. शेतकऱ्यांना लाभ होईल.’’

‘‘हा प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग दाखवेल,’’ अशी आशा प्रकाश अवचार यांनी व्यक्त केली. तर ‘‘संत्रा प्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा येईल, असा विश्वास ढोकणे यांनी व्यक्त केला. ‘अभिता’ने सोनाळा येथे संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू करुन कौतुकास्पद कार्य केल्याच्या भावना अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com