Processing Industry : कृषी प्रक्रिया उद्योग उभारणी ही काळाची गरज

Agriculture Scheme : कृषी प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या विविध योजनांचे पाठबळ देण्यात आले आहे. सर्वांनी या विविध योजनांचा लाभ घ्यावा व प्रक्रिया उद्योगांची उभारणी करावी.
Agriculture Processing
Agriculture Processing Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : कृषी प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या विविध योजनांचे पाठबळ देण्यात आले आहे. सर्वांनी या विविध योजनांचा लाभ घ्यावा व प्रक्रिया उद्योगांची उभारणी करावी. परंतु यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे, असल्याचे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी व्यक्त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड छत्रपती संभाजीनगरद्वारे ९२ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम बुधवारी (ता. १) झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. देशमुख बोलत होते.

या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस ४ एस टेक्नोलॉजीचे मुख्य कृषी विद्या अधिकारी गणेश कुटे आणि केव्हीके प्रमुख डॉ. किशोर झाडे केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. संजूला भावर, डॉ.अनिता जिंतुरकर आदींची उपस्थिती होती.

Agriculture Processing
Cotton Processing : राज्यातील जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड मंदच

श्री देशमुख म्हणाले, की भविष्यातील वाढत्या मागणीनुसार अन्नधान्य प्रक्रियेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी यांनी अन्नधान्य, फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगाकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. कृषी पदवीधरांसाठी तर प्रक्रिया उद्योग ही खूप उत्तम संधी आहे. ‍केवळ प्रक्रिया करूनच नाही, तर त्यामध्ये पुढे जाऊन मार्केटिंग व त्या वस्तूचे स्वतःचे ब्रॅण्डिंग करणे गरजेचे आहे.

Agriculture Processing
Cotton Processing : शेतकरी कंपनीने उभारला राज्यातील पहिला कापूस प्रक्रिया उद्योग

शेतकरी महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यातील योग्य समन्वयाने खूप चांगल्या प्रकारे प्रक्रिया उद्योग उभा करता येतो. तृणधान्यामध्ये देखील प्रक्रिया उद्योगाला प्रचंड संधी असल्याचे ते म्हणाले.

या वेळी नैसर्गिक शेतीवर डॉ. झाडे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रगतिशील शेतकरी दादासाहेब शिंदे, उद्धव शिरसाठ, सुदर्शन पोफळे, विकास लोळगे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बस्वराज पिसुरे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. संजूला भावर यांनी आभार प्रदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com