Sugarcane Crushing Season : सोलापुरात गाळप हंगामाला वेग

Sugarcane Crushing : सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामाने आता वेग घेतला आहे. १५ डिसेंबरअखेर जिल्ह्यातील २८ साखर कारखान्यांनी ३० लाख टनांहून अधिक ऊस गाळप केला आहे.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा

Solapur News : माळीनगर, जि. सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामाने आता वेग घेतला आहे. १५ डिसेंबरअखेर जिल्ह्यातील २८ साखर कारखान्यांनी ३० लाख टनांहून अधिक ऊस गाळप केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात नोव्हेंबरअखेर १७ कारखान्यांनी दहा लाख ३५ हजार ३४० टन उसाचे गाळप केले होते. विधानसभा निवडणुकीमुळे प्रारंभी ऊस गाळपाची गती मंद होती. निवडणुकीनंतर हंगामाने हळूहळू वेग पकडल्याचे आकडेवारी सांगते. १५ डिसेंबरअखेर २८ कारखान्यांनी ३० लाख २३ हजार ९८० टन उसाचे गाळप केले आहे.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing : गाळप हंगामाला अखेर सुरुवात

म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यातील कारखान्यांनी जवळपास २० लाख टन ऊसगाळप केले आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत २२ लाख ६४ हजार १८ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा साखर उतारा ७.४९ टक्के आहे.

जिल्ह्यातील १० सहकारी साखर कारखान्यांनी १३ लाख ३३ हजार ९६५ टन उसाचे गाळप करून ७.८९ टक्के सरासरी साखर उताऱ्याने १० लाख ५२ हजार ४१५ क्विंटल साखर उत्पादित केली. १८ खासगी कारखान्यांनी १६ लाख ९० हजार १६ टन गाळप करून ७.१७ टक्के साखर उतारा मिळवत १२ लाख ११ हजार ६०३ क्विंटल साखरनिर्मिती केली. गाळपात पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे कारखाना तर साखर उताऱ्यात पांडुरंग कारखाना अग्रेसर आहे.

१५ डिसेंबरअखेरचा कारखानानिहाय गाळप अहवाल

कारखाना गाळप (टन) साखर

(क्विंटल) उतारा

(टक्के)

सहकार महर्षी २,५१,१४० २,२५,१०० ८.९७

श्री शंकर १,०४,१५७ ७९,२५० ८.०२

सिद्धेश्वर ८३,९९५ ६३,०३५ ८.३६

विठ्ठल, गुरसाळे १,२३,०८० ९८,४०० ८.४९

पांडुरंग २,४४,५५१ २,१९,७५० ९.३५

संत दामाजी ८०,३०० ६९,९५० ८.५४

धाराशिव, सांगोला १७,३०५ ९,९८० ६.८९

सहकार शिरोमणी ६२,६०५ ४३,९५० ७.२१

विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर २,६९,१६१ १,५७,७५० ६.१८

लोकनेते १,१९,२७० १,०४,१५० ८.४४

सासवड माळी १,१६,५२० ८९,७९० ८.०

लोकमंगल, बिबीदारफळ ४९,९१४ २२,२१० ५.१९

विठ्ठल कॉर्पोरेशन ५०,६७९ २४,१५० ४.३९

लोकमंगल, भंडारकवठे १,०५,१४३ ३६,०१८ ४.४६

सिद्धनाथ १,४८,५२० १,१०,२०० ७.५७

जकराया ८६,६९० ६४,६५० ७.६९

इंद्रेश्वर ४२,२७३ २९,७५० ६.८८

येडेश्वरी ३९,५२४ २७,८०० ७.६८

विठ्ठलराव शिंदे, करकंब ९७,६७१ ८५,२५० ८.८७

सीताराम महाराज ९०,८०९ ६७,७०० ७.५२

ओंकार, चांदापुरी ६९,३६६ ४८,१८५ ७.७९

आवताडे शुगर १,०३,७७५ ८५,८०० ७.४५

युटोपियन १,५०,३६४ ८०,१०० ५.४६

भैरवनाथ, लवंगी २६,११९ १९,०५० ७.५८

भैरवनाथ, आलेगाव ८३,७०८ ७२,२५० ८.८८

बबनरावजी शिंदे १,५१,३८० १,३२,३०० ८.९४

व्ही. पी. शुगर्स १,७४,६५७ १,४२,३५० ८.५२

आष्टी शुगर ८४,३०४ ५५,१५० ६.७३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com