
Solapur News : यंदाच्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात गाळप झालेल्या उसाची दहा साखर कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली आहे. हंगाम संपून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही जिल्ह्यातील २३ कारखान्यांकडे अजूनही ३०८.५३ कोटी रुपयांची एफआरपी थकली आहे. दरम्यान, बहुतांश कारखान्यांनी ऊस मिळविण्यासाठी हंगामाच्या प्रारंभी जाहीर केलेला ऊसदर एफआरपीपेक्षा अधिक आहे. त्या अधिकच्या दरानुसार ऊसबिले मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
यावर्षी जिल्ह्यात ३३ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. गाळप झालेल्या उसाचे १४ दिवसात पेमेंट देणे साखर कारखान्यांना कायद्याने बंधनकारक आहे. कारखान्यांचे हंगाम संपले तरी गेली दोन महिन्यांपासून उसाची बिले अद्यापही मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
१५ फेब्रुवारीअखेर जिल्ह्यातील कारखान्यांकडे ६७५ कोटी रुपये एफआरपी थकीत होती. त्यानंतरच्या दीड महिन्यात म्हणजे मार्चअखेर त्यापैकी ३६७ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखाने
पांडुरंग, सहकार महर्षी, विठ्ठलराव शिंदे (पिंपळनेर व करकंब), विठ्ठल कार्पोरेशन, ओंकार (चांदापुरी), व्ही. पी. शुगर्स, सीताराम महाराज, श्री शंकर, येडेश्वरी
कारखानानिहाय मार्चअखेरची थकीत एफआरपी (कोटीत)
कारखाना थकीत
सिद्धेश्वर २०.९२
संत दामाजी १८.८४
संत कुर्मदास १.७४
लोकनेते ०.९२
सासवड माळी ९.३३
लोकमंगल (बीबीदारफळ) ७.७९
लोकमंगल (भंडारकवठे) ३०.८८
सिद्धनाथ ३७.४२
जकराया ७.४२
इंद्रेश्वर २२.३५
भैरवनाथ (लवंगी) १०.२४
युटोपियन ८.५१
गोकूळशुगर्स (धोत्री) १७.२२
मातोश्री ५.८७
भैरवनाथ (आलेगाव) १६.७१
बबनरावजी शिंदे ०.४३
जयहिंद ३०.०४
आष्टी शुगर ११.०३
भीमा ५.१४
सहकार शिरोमणी १३.४१
धाराशिव (सांगोला) २.३५
आवताडे शुगर्स २५.२९
विठ्ठल (वेणूनगर) ४.६८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.