Sugarcane Bill Payments : करमाळ्यातील शेतकऱ्यांना ऊसबिलाची प्रतीक्षा

Bill Delay Issue : करमाळा तालुक्यातील ऊस गाळपासाठी तालुक्याबाहेरच्या कारखान्यांमध्ये पाठविला जात आहे. कारखाने सुरू होऊन दोन महिने होत आले तरी अद्याप शेतकऱ्यांना खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आलेला नाही.
Sugar Industry
Sugar IndustryAgrowon
Published on
Updated on

Karmala News : करमाळा तालुक्यातील ऊस गाळपासाठी तालुक्याबाहेरच्या कारखान्यांमध्ये पाठविला जात आहे. कारखाने सुरू होऊन दोन महिने होत आले तरी अद्याप शेतकऱ्यांना खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आलेला नाही. कारखान्यांनी उसाच्या बिलाचा पहिला हप्ता तत्काळ जमा करण्याची मागणी केली जात आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना अन्य कारखान्यांना ऊस घातल्याशिवाय पर्याय नाही. या भूमिकेतून ऊस दराकडे दुर्लक्ष केले जात असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. मागील वर्षी २९०० पहिला हप्ता जमा केला, त्यानंतर शंभर किंवा दोनशे रुपये शेतकऱ्यांना मिळतील अशी अपेक्षा होती मात्र, कारखान्याने २९०० पेक्षा जास्त पैसे दिले नाहीत. यावर्षी २९०० तरी अंतिम दर मिळेल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे.

Sugar Industry
Sugarcane Crushing : ऊस गाळपात ‘बारामती अॅग्रो’ची आघाडी

चालू हंगामात उसाचा तुटवडा जाणवत आहे. तालुक्यातील चारही साखर कारखाने बंद आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस अन्य कारखान्यांना घालावा लागत आहे. सध्या करमाळा तालुक्यातील ऊस गाळपासाठी अन्य तालुक्यात पाठविला जात आहे. १५ नोव्हेंबरला कारखाने सुरू झाले दोन महिने उलटून गेले तरीही अद्याप कोणत्याही कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले नाहीत.

बारामती ॲग्रो, शेटफळगढे, जि.पुणे, अंबालिका शुगर, राशीन ता.कर्जत, जि.अहिल्यानगर, गौरी शुगर, हिरडगांव (जि.अहिल्यानगर), श्रीपूर सह.साखर कारखाना, सहकारमहर्षी सह.साखर कारखाना, अकलूज, दि. माळीनगर शुगर, माळीनगर (ता.माळशिरस) हे साखर कारखाने करमाळा तालुक्यातील ऊस गाळपासाठी नेत आहेत.

Sugar Industry
Sugar MSP Hike : साखरेच्या ‘एमएसपी’ वाढीची नववर्षात भेट

दरवर्षी कारखाने सुरू झाल्यानंतर १५ ते २० दिवसानंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरवात होते. यावर्षी उसाला दर किती मिळेल, हेही अद्याप जाहीर करण्यात आले नाही. अशा परिस्थितीत उसाचे पैसे मिळावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत. मागील हंगामात २९०० रुपयांचा दर दिला त्यानंतर शंभर किंवा दोनशे रुपयांचा हप्ता निघेल असे सर्वांना वाटत होते मात्र, नंतर हप्ता निघाला नाही.

चालू हंगामात मात्र तालुक्यातील कारखाने बंद असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची कोंडी झाली असून, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या कारखान्यांना ऊस घातल्या शिवाय पर्याय नाही या भावनेतून तालुक्यात कारखानदारांनी बिल जमा करण्याकडे दुर्लक्ष केले असून, गेल्यावर्षी एवढा तरी दर यावर्षी मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

‘शिंदे’कडून पहिला हप्ता जमा

माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखाना पिंपळनेर हा साखर कारखाना करमाळा तालुक्यातील केम, कंदर भागातील ऊस गाळपासाठी घेऊन जातो या कारखान्याने २८०० रुपये पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे.

कारखाने सुरू होण्याती गरज

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची भविष्यात इतर कारखानदारांकडून होणारी पिळवणूक थांबवायची असेल तर तालुक्यातील कारखाने सुरू झाले पाहिजेत. विशेषतः करमाळा तालुक्यातील आदिनाथ सह. साखर कारखाना व मकाई सहकारी साखर कारखाना हे साखर कारखाने सुरू होणे अत्यंत गरजेचे असून, हे कारखाने सुरू झाल्यास बाहेरील कारखाने देखील चांगला व वेळेवर दर देतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com