Solapur News : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हास्तरीय समन्वय समिती, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती, १०८ रुग्णवाहिकांच्या सेवाबाबत, एनटीपीसी समन्वयक समिती, जिल्हास्तरीय दक्षता समिती, कुष्ठरोग शोध मोहीम आणि स्पर्श अभियान सीएस तसेच जिल्हास्तरीय स्थायी लेखा परिक्षण समिती अशा विविध विभागांच्या कामकाजाचा बैठकीद्वारे आढावा घेऊन सर्व संबंधित विभागाने आरोग्य विभागाच्या विविध योजनांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, डीपीओ भगवान भुसारी, सहायक संचालक आरोग्य सेवा (कृष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आनंद गोडसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती वैशाली थोरात, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीमती वंदना शिंदे, पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध पथकामार्फत शोध घेऊन त्याचे निदान निश्चित करणे व निदान झालेल्या कुष्ठरुग्णांना तत्काळ बहुविध औषधोपचार सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने कुष्ठरोग अभियान सुरु केले आहे, हे अभियान १४ दिवसांचे असणार आहे.
या अभियानात राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील या १४ दिवसांच्या अभियानासाठी ३६ लाख ५७ हजार ५९० लोकसंख्येची निवड करण्यात आली असून, २७६८ शोधपथके तयार करण्यात आली आहेत.
शोध पथकाने शोधलेल्या प्रत्येक संशयिताची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे. या अभियान दरम्यान तपासणी करण्याकरिता येणाऱ्या पथकाकडून तपासणी करून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम यांनी केले आहे. यावेळी त्यांनी विविध विभागाच्या अडचणी समजावून घेतल्या. अडचणी तत्काळ दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, याबाबत सर्व विभागांना अश्वस्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.