Solapur Mathadi Board : माथाडी बोर्डाच्या रिक्त जागांवर हमाल-तोलारांच्या वारसांची नेमणूक करा

Hamal Worker : हमाल-तोलारांच्या वारसांना यात प्राधान्य दिल्यास, त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा हातभार लागणार आहे. या वेळी या बैठकीमध्ये जिल्ह्यातील हमाल, तोलार कामगारांच्या विविध अडी-अडचणींवर चर्चा करण्यात आली.
Mathadi Kamgar
Mathadi KamgarAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्हा माथाडी मंडळातील कर्मचाऱ्यांची संख्या सध्या कमी झाली असून, त्या जागेवर माथाडी हमाल, कामगार, तोलारांच्या मुला-मुलींना किंवा पाल्यास रिक्त पदावर कंत्राटी व करार पद्धतीने नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी सोलापूर जिल्हा हमाल मापाडी-माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी माथाडी बोर्डाचे चेअरमन, सहायक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांच्याकडे केली आहे.

सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीची नुकतीच सोलापूर येथील माथाडी बोर्डाच्या हॉलमध्ये माथाडी बोर्डाचे सुधीर गायकवाड यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील हमाल मापाडी माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Mathadi Kamgar
Mathadi Labor : माथाडी कामगार निवडणुकीवर बहिष्काराच्या मनःस्थितीत

श्री. शिंदे म्हणाले, की हमाल-तोलारांच्या वारसांना यात प्राधान्य दिल्यास, त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा हातभार लागणार आहे. या वेळी या बैठकीमध्ये जिल्ह्यातील हमाल, तोलार कामगारांच्या विविध अडी-अडचणींवर चर्चा करण्यात आली.

Mathadi Kamgar
Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

या वेळी माथाडी बोर्डाचे निरीक्षक मिलिंद सलगर, सुधीर जुमनाळकर, प्रमोद माने, समन्वय समितीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमा सीताफळे, गोरख जगताप, जिल्हा सचिव संतोष सावंत, शिवानंद पुजारी, चांदा गफारा उपस्थित होते.

या मागण्यांवर झाली चर्चा

प्रामुख्याने नोंदीत कामगारांच्या संख्येत घट होत असल्याने नवीन हमाल व तोलार कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात यावी, बोगस नोंदणी थांबविण्यात यावी, माथाडी बोर्डाच्या निरीक्षकाने प्रत्येक केंद्रास भेट द्यावी, हमाल, तोलार कामगारांचे पगार वेळेत व्हावेत, माथाडी बोर्डात पगार न भरणाऱ्या मालक, आडत्या व दुकानदार तसेच कामगारांवरही कारवाई करण्यात यावी, माथाडी बोर्डातील पगारपत्रक वर्षाअखेरच कामगारांना देण्यात यावे, त्यामुळे त्यांचा फंड किती जमा होतो हे दिसून येईल, या मागण्यांवर या वेळी चर्चा करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com