Agriculture Work Survey: मृदा, जलसंधारणाच्या कामांची होणार पडताळणी

Sustainable Development: महाराष्ट्रात मृदा व जलसंधारण विभागाने केलेल्या कामांची रिमोट सेन्सिंगद्वारे पडताळणी होणार आहे. एप्रिल-मे महिन्यात शिवारफेरीद्वारे संरचनांची पाहणी होणार असून याचा अहवाल डिजिटल स्वरूपात नोंदवला जाणार आहे.
Agriculture Work Survey
Agriculture Work SurveyAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: मृदा व जलसंधारण विभागाने गेल्या काही वर्षांत विविध विभागांमार्फत केलेल्या कामांची माहिती संकलित करण्यात येणार असून रिमोट सेन्सिंग ॲपवर नोंदविण्यात येणार आहे. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून एका प्लॅटफॉर्मवर याची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

१ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत शिवारफेरी करून संरचनांची व स्थळ पडताळणी तालुका पातळीवर होणार आहे. यासाठी मृदा व जलसंधारण विभागाचे राज्य व जिल्हा परिषद स्तरावरील अधिकारी, कृषी विभागाचे कृषी सहायक किंवा पर्यवेक्षक, वन विभागाचे वनपाल आणि मृदा व जलसंधारण (वसुंधरा) विभागाकडील पाणलोट विकास पथक, कृषी, स्थापत्य अभियंता किंवा समूह संघटक पथक प्रमुख म्हणून काम करणार आहेत. तर जिल्हास्तरीय समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी असून ११ सदस्यीय समिती असेल. तालुका पातळीवर प्रांताधिकारी अध्यक्ष असून गटविकास अधिकारी सहअध्यक्ष असतील.

Agriculture Work Survey
Agriculture Survey : नुकसानग्रस्तांचा रोष टाळण्यासाठी पंचनामे लवकर करा

राज्यात मागील काही वर्षांत पाणलोट क्षेत्रांमध्ये मृदा संधारण व जलसंधारणाची कामे कृषी विभाग, जलसंधारण विभाग, जिल्हा परिषदेचा लघू पाटबंधारे विभाग, वन विभाग, रोजगार हमी विभाग, भूजल सर्वेक्षण यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत केली आहेत. विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या मृद्‍ संधारण व जलसंधारणाच्या कामांची माहिती एकत्रितपणे उपलब्ध नाही. त्यामुळे कामांबाबत धोरणात्मक निर्णय घेता येत नाही.

महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (एमआरसॅक) यांच्याकडे विविध योजनांतर्गत झालेल्या मृदासंधारण व जलसंधारणाच्या कामांची माहिती उपलब्ध आहे. या माहितीच्या आधारे कामांच्या प्रकारानुसार सिग्नेचर्स विकसित करून सॅटेलाईट इमॅजरीद्वारे कामे चिन्हांकित केली आहेत. या दोन्ही माहिती स्रोतांद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे एमआरसॅकने नकाशावर कामे चिन्हांकित केली आहेत. त्यामुळे हे मॅप वापरून चिन्हांकित केलेल्या कामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी व सत्यता पडताळणी करून त्यांची आजच्या स्थितीबाबतची माहिती एकत्रित करण्यासाठी व एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी एमआरसॅक आणि मृदा व जलसंधारण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

त्यानुसार मृदा व जलसंधारण विभागाच्या कामांचे, संरचनांचे मॅपिंग आणि प्रत्यक्ष स्थळ पडताळणी करण्यासाठी प्रत्येक गावात शिवार फेरी घेण्यात येणार आहे. शिवार फेरीसाठी क्षेत्रीय आणि गावपातळीवरील सर्व शासकीय यंत्रणा व स्थानिकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

Agriculture Work Survey
Ai in Agriculture: शेतीत क्रांती! एआय उपकरणास सरकारकडून पेटंट मान्यता

या शिवारफेरीतून नोंद असलेल्या अस्तित्वातील संरचनांची प्रत्यक्ष पाहणी करून पडताळणी करण्यात येणार आहे, तसेच नोंद नसलेल्या आणि शिवारफेरीदरम्यान आढळून आलेल्या संरचना व सध्या काम सुरू असलेल्या नवीन कामांची नोंद घेण्यात येईल. या कामांची पडताळणी केल्यानंतर संबंधित संरचनांच्या सद्यःस्थिती व उपयुक्ततेबाबत माहिती मोबाइल ॲपमध्ये नोंदवली जाणार आहे.

यामध्ये या कामांची दुरुस्ती करणे, नवीन संरचना बांधणे, आवश्यकतेनुसार नाला खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे आदी कामांचा यात समावेश असेल. या शिवारफेरीसाठी मृदा व जलसंधारण विभागाचे राज्यस्तरावरील आणि जिल्हा परिषद स्तरावरील उपविभागीय जलसंधारण अधिकारी किंवा जलसंधारण अधिकारी, कृषी सहायक किंवा कृषी पर्यवेक्षक, वनपाल, पाणलोट विकास पथक पथकप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

...अशी असेल शिवारफेरी

गावनिहाय स्थानिक ग्रामस्थ आणि क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयाने कामांना प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी शिवारफेरी करण्यात येणार आहे. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, प्रगतिशील शेतकरी, प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामरोजगार सेवक, पाणलोट क्षेत्रात काम करणाऱ्या गावातील व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी गट, महिला बचत गटांचे प्रतिनिधी आणि इच्छुक अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी व ग्रामस्थांचा समावेश असेल. तालुकास्तरीय समिती शिवारफेरीचे आयोजन करेल. तसेच शिवारफेरीत कोण असेल याची जबाबदारी सरपंच व ग्रामसेवकाची असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com