Onion Smuggling : टोमॅटोच्या नावाखाली कांद्याची परदेशात तस्करी ; निर्यातबंदी शेतकऱ्यांच्या मुळावर

Onion Export Ban : केंद्र सरकराने कांद्यावर निर्यातबंदी घालून आता दोन महिने उलटत आले. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर घाला घालण्याचा आरोप शेतकऱ्यांनी सरकारवर केला आहे.
Onion Smuggling
Onion Smuggling Agrowon
Published on
Updated on

Onion Market Update : केंद्र सरकराने कांद्यावर निर्यातबंदी घालून आता दोन महिने उलटत आले. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर घाला घालण्याचा आरोप शेतकऱ्यांनी सरकारवर केला आहे. निर्यातबंदीमुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याला चांगली मागणी आहे. मात्र, निर्यातबंदीमुळे अनेक देशांत कांद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे आता भारतातून छुप्या पद्धतीने कांदा तस्करीच्या घटना वाढू लागल्या आहेत. कांद्यावर निर्यातबंदी असल्याने टोमॅटोच्या कंटेनरमधून कांद्याची तस्करी केली जात आहे.

Onion Smuggling
Onion Market : निर्यातबंदीतही होतेय परदेशांत कांदा तस्करी

अशीच टोमॅटोच्या नावाखाली कांद्याची तस्करीची घटना समोर आली आहे. टोमॅटोच्या कंटेनरमधून तब्बल ८२.९३ टन कांदा युएईला पाठविण्यात येत असल्याची गोपनीय माहिती सीमा शुल्क विभागाच्या नागपूर युनिटला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Onion Smuggling
Onion Market : नव्या उन्हाळ कांद्याची आवक सुरू

सीमा शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, टोमॅटोच्या कंटेनरमधून कांदा परदेशात पाठवला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हा कांदा जप्त करत कारवाई करण्यात आली. नाशिक येथील दोन निर्यातदरांनी कंटेनरमध्ये टोमॅटोच्या पेट्यांमागे कांदा पॅक करून युएईला पाठविण्याची तयारी होती.

मात्र, सीमा शुल्क विभागाच्या नागपूर युनिटने मुंबईत कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरच्या समोरच्या बाजूला टोमॅटोचे बॉक्स तर पाठीमागे कांद्याची पोती लपवून ठेवल्याचे आढळून आले.

दरम्यान, निर्यातबंदीमुळे दराअभावी शेतकऱ्यांच्या कांद्याला मोतीमोल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका आणि आखाती देशात कांद्याची छुप्या मार्गाने तस्करी होत असल्याच्या घटना घडत आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने कांदा खरेदी करून परदेशात त्याची तस्करी केली जात असून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com