Smart Health Center : ‘स्मार्ट’ आरोग्य केंद्र पॅटर्न राज्यभर राबविणार : शिंदे

Eknath Shinde : सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘स्मार्ट पीएचसी’चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविण्यात येईल,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Satara News : ‘‘राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘स्मार्ट पीएचसी’चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविण्यात येईल,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पीएचसी) व अन्य उपक्रमांचा ई- प्रारंभ, ई- भूमिपूजन, लोकार्पण श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ येथे करण्यात आले. या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री अतुल सावे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

Eknath Shinde
Milk Subsidy : अखेर दूध अनुदानाच्या शासन आदेशाला मिळाला मुहूर्त! दूध उत्पादकांना मिळणार ५ रुपये अनुदान

श्री. शिंदे म्हणाले, ‘‘राज्य शासनाने २०३५ चे व्हिजन तयार केले आहे. त्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत अनेक निर्णय घेतले. वैद्यकीय महाविद्यालयांना जोडलेली जिल्हा रुग्णालये परत मिळण्यात अनेक वर्षे जातात म्हणून पर्यायी यंत्रणा उभी राहावी, यासाठी निर्णय घेतले.

Eknath Shinde
Pankaja munde : शरद पवार यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे यांचा थेट इशारा; म्हणाल्या, '...तर रस्त्यावर उतरावं लागेल'

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दीड लाख रुपयांची मर्यादा पाच लाख रुपयांवर नेण्याचा निर्णय व त्याचा सर्वांना लाभ, आरोग्य विभागामार्फत महिला व बालकांची आरोग्य तपासणी, शासकीय रुग्णालयात कॅशलेस सेवा देण्याचा निर्णय राबविण्यात येत आहे.’’

‘‘सातारा जिल्ह्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. पर्यटनाला मोठी चालना मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे. येथील शेतकरीदेखील आधुनिक पद्धतीने शेती करत असतात. यापुढील काळात नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे,’’ असेही शिंदे म्हणाले.

...या कार्यक्रमांना प्रारंभ

४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे

५२ कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येणाऱ्या फलटण तालुक्यातील पवारवाडी, सातारा तालुक्यातील निनाम, कोरेगाव तालुक्यातील एकंबे आणि पाटण तालुक्यातील मारुल हवेली या ४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ई-भूमिपूजन

नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र ताथवडा, गुरसाळे, क्षेत्र माहुली, अंगापूर व येळगाव या ठिकाणी देण्यात येणाऱ्या ६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

प्राथमिक आरोग्य केंद्रांना आयआय केअर फाउंडेशनने ‘सीएसआर’अंतर्गत दिलेल्या १२५ संगणकाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com