
Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील एकूण ७४९ लघु प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन व धाराशिव जिल्ह्यातील एक मिळून तीन प्रकल्प कोरडे पडले आहेत.
दुसरीकडे आठही जिल्ह्यातील ५४ लघु प्रकल्पातील पाणीसाठा (Water Stock) जोत्याखाली गेला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्पांसह बंधाऱ्यामधील उपयुक्त पाणीसाठा ५७ टक्क्यांवर आला आहे.
त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पातील ६५ टक्के, मध्यम ७५ प्रकल्पातील ५२ टक्के, लघु ७४९ प्रकल्पातील ३५ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमधील ५० टक्के, तसेच तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २५ बंधाऱ्यांमधील ४२ टक्के पाणीसाठ्याचा समावेश आहे.
जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या लघु प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १२, जालनामधील ८, बीडमधील ११, लातूरमधील ५, धाराशिवमधील ६, नांदेडमधील ८, हिंगोलीतील तीन व परभणीतील एका लघु प्रकल्पाचा समावेश आहे.
१९३ लघु प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून केवळ २३ लघु प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मोठ्या ११ प्रकल्पांपैकी केवळ दोन प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असून एका प्रकल्पात २५ ते ५० टक्के दरम्यान तर ८ प्रकल्पात ५० ते ७५ टक्के दरम्यान पाणीसाठा शिल्लक आहे.
७५ मध्यम प्रकल्पांपैकी ७ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी, २७ प्रकल्पात २५ ते ५० टक्के दरम्यान, ३७ प्रकल्पात ५० ते ७५ टक्के दरम्यान तर केवळ ४ प्रकल्पात ७५ टक्केपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी निम्न दुधना प्रकल्प वगळता इतर सर्व प्रकल्पात ५० ते ८२ टक्के दरम्यान उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मध्यम प्रकल्पात आजच्या घडीला असलेला ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा गतवर्षी याच तारखेला असलेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत १० टक्के कमीच आहे.
दुसरीकडे ७४९ लघु प्रकल्पात असणारा ३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ९ टक्क्याने कमी आहे.
मराठवाड्यातील लघु प्रकल्पांमधील सरासरी उपयुक्त पाणीसाठा ४५ टक्क्यांपेक्षा कमी असून नांदेड जिल्ह्यातील ८० लघु प्रकल्पात सर्वात कमी २३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.
प्रकल्प निहाय सरासरी उपयुक्त पाणीसाठा
प्रकल्प - संख्या - पाणीसाठा (दलघमी)
मोठे- ११- ३३८८
मध्यम - ७५- ४९६.८१३
लघु - ७४९- ६०५.९४८
गोदावरी बंधारे- १५ - १७४.३२५
तेरणा, मांजरा, रेना बंधारे- २५ -३२.९४४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.