Water Storage : ‘कुंभी’त ६५ टक्के पाणीसाठा

कुंभीतून बॅकवॉटर योजनेद्वारे धामणी नदीपात्रात पाणी आणण्याच्या प्रयोगामुळे पूर्वेकडील नदीपात्र भरत असले तरी पश्चिमेकडील पात्र कोरडेच असते.
Water Stock
Water StockAgrowon

Kolhapur News : अतिपावसाचा (Excessive Rain) तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडात कुंभी मध्‍यम तर कोदे, अणदूर, वेसरफ हे लघु असे एकूण चार पाटबंधारे प्रकल्‍प (Irrigation Project) आहेत.

प्रकल्पांत गुरुवारी (ता. २३) शिल्‍लक पाणीसाठा कुंभी, सरस्‍वती व रूपणी नदीकाठच्‍या गावांना मे अखेरपर्यंत पुरेल. मात्र धामणी प्रकल्पाची व्याप्ती असलेल्या धुंदवडे खोऱ्यातील काही गावांना एप्रिल-मेमध्‍ये पाणीटंचाई (Water Shortage) सोसावी लागण्याची शक्यता आहे.

Water Stock
Water Literacy : दुष्काळाचा सामना करण्यासाठी गावकऱ्यांनी जलसाक्षर होणे आवश्यक

लखमापूरमधील कुंभी मध्‍यम प्रकल्‍पात १.७१ टीएमसी म्हणजेच क्षमतेच्या ६५.७६ टक्के पाणीसाठा आहे. गगनबावड्यासह पन्‍हाळा व करवीर या तीन तालुक्‍यांतील हजारो एकरांतील पिके सिंचनासाठी प्रकल्पावर अवलंबून आहेत. या प्रकल्पातील पाणी कुंभी नदीत सोडले जाते.

बॅकवॉटर पद्धतीने कळे बंधाऱ्यातून पाणी धामणी नदीत सोडावे लागते. कोदे लघु प्रकल्‍पात ५२.९७ टक्के, अणदूर प्रकल्पात ६३.८३ टक्के तर वेसरफ प्रकल्पात ४०.६५ टक्के पाणीसाठा आहे.

धुंदवडे खोऱ्यातील गावे धामणी नदीवर अवलंबून आहेत. खेरीवडेपासून पश्चिमेकडील गावे व वाड्या-वस्‍त्‍यांना मार्चमध्ये धामणीचे पात्र कोरडे पडत असल्‍याने पाण्यासाठी वणवण करावी लागते.

कुंभीतून बॅकवॉटर योजनेद्वारे धामणी नदीपात्रात पाणी आणण्याच्या प्रयोगामुळे पूर्वेकडील नदीपात्र भरत असले तरी पश्चिमेकडील पात्र कोरडेच असते.

पाणीसाठ्यासाठी धामणीवर दरवर्षी श्रमदानातून व स्‍वखर्चातून लाखो रुपये खर्च करून मातीचे बंधारे घालतात. पण हे पाणीही कसेबसे एप्रिलपर्यंत पुरते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com