

Solapur News Update : रोपळे बुद्रूक : सोलापूर जिल्ह्यात शेतीला उपयुक्त असा पाऊस अद्यापही पडला नाही. त्यामुळे ॲग्रीकल्चर मार्केटिंग क्षेत्रात प्रचंड मंदीचे सावट पसरले आहे. सेलच होत नसल्यामुळे या क्षेत्रातील लाखो रूपयाची उलाढाल ठप्प झाली आहे.
पाऊस हा शेती अर्थकारणाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे पाऊस वेळेत आणि पुरेसा पडला तरच शेतीचे अर्थकारण चांगले चालते. यावेळी पाऊस तब्बल दीड महिन्यापासून हुलकावणी देतोय.
सगळीकडे पावसाला सुरवात झाली असली तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र पावसाची प्रतिक्षाच आहे. काही भागात पाऊस पडला असला तरी तो पाऊस पेरणीयोग्य नाही. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस पडण्याची गरज भासू लागली आहे. खरिपातील उडीद, तूर, मूग व मकेच्या लागवडी झाल्या नाहीत. हा हंगाम लेट झाल्यामुळे यातील उडीद व मुगाची पेरणी होणार नाही.
कृषी सेवा केंद्र चालकांनी मोठ्या प्रमाणात बियाणे खरेदी केले आहे. यात त्यांनी लाखो रूपयाची गुंतवणूक केली आहे. मात्र, बियाण्यांचा सेलच झाला नाही. पावसाअभावी बियाणे पडून राहिले आहे. बियाणे विक्रेत्यांनी बियाणे रोखीने खरेदी केले आहे.
बियाणे विक्रीच झाले नसल्यामुळे त्यांचे लाखो रुपये बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांकडे अडकून पडले आहेत. दुसरीकडे बियाणे कंपन्यांनी रोखीने बियाणे विक्री केली असली तरी बियाण्याची विक्रीच झाली नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेले बियाणे कंपन्यांना परत घ्यावे लागणार आहे.
कंपन्या बियाणे परत घेत असल्या तरी बियाणे विक्रेत्यांना पैसे परत देत नाहीत. त्यामुळे बियाण्यासाठी घेतलेले पैसे. कंपन्या पुढच्या वर्षी बियाणे खरेदी केल्यावर वजा करतात. आता बियाणे विक्रेत्यांनी गुंतवलेले पैसे कंपन्यांकडे पडून राहिले आहे. त्यामुळे त्याचे व्याज वाढत आहे.
बियाणे विक्रीची ही अवस्था असली तरी कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे व रासायनिक खतांवरच जास्त गुंतवणूक केली आहे. त्यामुळे कीटकनाशके, बुरशीनाशके, प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर व तणनाशके बनवणाऱ्या कंपन्यांच्या प्रोडक्टची मागणीच थांबली आहे. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.