Sugar Production : देशात ऊस लागवडीत काहीशी घट; साखर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता?

Sugarcane Cultivation : २०२५-२६ च्या साखर हंगामात उत्पादनात काहीशी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु चांगल्या मॉन्सूनच्या अंदाजामुळे अंतिम अंदाजात सकारात्मक बदल होईल, अशी अपेक्षा आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon
Published on
Updated on

Sugarcane Production : देशात मागील वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे साखर हंगामात उत्पादन वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु देशातील ऊस लागवडीच्या सुरुवातीच्या आकडेवारीत ऊस लागवडीखालील क्षेत्रात थोडीशी घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे २०२५-२६ च्या साखर हंगामात उत्पादनात काहीशी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु चांगल्या मॉन्सूनच्या अंदाजामुळे अंतिम अंदाजात सकारात्मक बदल होईल, अशी अपेक्षा आहे.

हवामान आणि पावसाचं बदलत्या स्वरूपामुळे ऊस शेतीला फटका बसत आहे. त्याचा थेट परिणाम साखर उत्पादन होत आहे, असं जाणकार सांगतात. मागील वर्षी मेच्या पहिल्या आठवड्यात देशातील ऊस लागवडीचं क्षेत्र ५३.४ लाख हेक्टर होतं. यंदा याच कालावधीत ऊस लागवडीचं क्षेत्र ५३.१ लाख हेक्टर होतं. म्हणजेच ०.३ हेक्टरने घट झाली आहे. त्याचा परिणामी साखरेचा उत्पादनावर होत आहे.

Sugar Production
Sugarcane AI : ऊस पिकातील एआयसाठी हेक्टरी २५ हजार रुपये देणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

देशात सर्वाधिक साखरेचं उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये होतं. मागील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये ८ मेपर्यंत २८.८ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली. परंतु यंदा मात्र याच कालावधीत २७.९ लाख हेक्टर क्षेत्रावरच ऊस लागवड झाली होती. प्रमुख ऊस उत्पादक राज्यातील ऊस लागवडीखालील क्षेत्रात काहीशी घट दिसून आली आहे. परंतु अंतिम अंदाज वेगळे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कृषी मंत्रालयाच्या २०२४-२५ च्या प्राथमिक आकडेवारीनुसार, मागील वर्षी २६.५ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा ऊस लागवड २५.९ लाख हेक्टरवर आली आहे. कर्नाटकमध्ये यंदा लागवडीचं क्षेत्र वाढलं आहे. मात्र कर्नाटकमधील साखर उत्पादन ३१ मेपर्यंत ४०.४ लाख टन झालं आहे. मागील वर्षी कर्नाटकमधील साखर उत्पादन ५१.४ लाख टन होतं. त्यामुळे लागवडीचं क्षेत्र वाढलं की, उत्पादन हमखास वाढतंच, असं नाही. परंतु ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच मॉन्सून संपेपर्यंत लागवड क्षेत्रात आणि उत्पादनात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sugar Production
AI In Sugarcane Farming : ऊस शेतीमधील ‘एआय’साठी आज ‘व्हीएसआय’मध्ये होणार करार

दरम्यान, ऑल इंडिया शुगर ट्रेड असोशिएशन अर्थात एआयएसटीएच्या मते, भारतात २०२४-२५ च्या साखर पणन वर्षात ६ जूनपर्यंत ५.१६ लाख टन साखर निर्यात केली आहे. यामध्ये सर्वाधिक १ लाख १८ हजार ५५३ टन साखर सोमालियाला निर्यात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने २० जानेवारी २०२५ रोजी साखर निर्यातीला परवानगी दिली होती. या परवानगी अंतर्गत एकूण १० लाख टन साखर निर्यात करण्याची मर्यादा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com