
Beed News : जिल्ह्याच्या एकूण आराखड्यातील ५३६.४४ कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली असून, त्यातील वितरित एकूण निधी १५६.४८ कोटी व खर्च १५४.३ कोटी इतका आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली. त्यामध्ये चालू वर्षाचा नियोजन आराखडा आणि त्यात आतापर्यंत झालेल्या खर्चाची स्थिती याचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये ही माहिती पुढे आली.
बैठकीस व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, तसेच खा. रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे, बीडचे पालक सचिव तथा आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे तसेच जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने, पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत व सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे यांची उपस्थिती होती. नियोजन समिती सदस्यांमध्ये आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, सुरेश धस, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित आदींची उपस्थिती होती.
सर्वसाधारण योजनेचा आराखडा ४८४ कोटीचा असून अनुसूचित उपयोजना आराखडा १२९ कोटींचा आहे. यासोबतच ओटीएसपी अंतर्गत २ कोटी ५० लक्ष अशी एकूण ६१५ कोटी ५० लाखांचा नियतव्यय मंजूर आहे. यात सर्वसाधारण अंतर्गत ४६७.७० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यंत्रणांना १२५.३९ कोटी (एकूण रकमेच्या ४० टक्के) निधी वितरित करण्यात आला आहे.
ज्यापैकी जानेवारी अखेर १२३.३ कोटी खर्च झाला आहे. बैठकीत श्री. पवार म्हणाले, की बीडमध्ये गुंतवणूक येण्यासाठी आवश्यक अशी मुंबई ते बीड थेट रेल्वे सुरू करण्यासोबतच येणाऱ्या काळात बीडसाठी विमानतळ देण्याबाबतही सकारात्मक आहे. राज्यातील यापुढील सर्व जिल्ह्यांचा उर्वरित निधी आढाव्यानंतर मोकळा करू. नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांनी आधी शहर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष द्यावे पुढील भेटीत मला संपूर्ण शहर स्वच्छ दिसले पाहिजे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.
कामात दिरंगाई केल्यास कारवाई
या बैठकीपूर्वी त्यांनी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांकडून विविध कामांचा आढावा घेतला व सर्वांनी चांगले काम करावे अशा सूचना देताना कामात दिरंगाई करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशाराही दिला. नियोजन समितीच्या बैठकीत या वेळी प्रशासनातर्फे सर्वांचे स्वागत संविधान देऊन यावेळी करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.