Agriculture Employee Suspension: दोन कृषी पर्यवेक्षकांसह सहा कृषी सहायक निलंबित

Maharashtra Agriculture Corruption: नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म सिंचन व ‘पोकरा’ योजनेअंतर्गत ६ कोटी रुपयांचा बनावट दस्तऐवजांच्या आधारे घोटाळा उघड झाला आहे. दोन कृषी पर्यवेक्षक आणि सहा कृषी सहायकांना निलंबित करण्यात आले असून, अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
Employee Suspension
Employee SuspensionAgrowon
Published on
Updated on

Nanded News: पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेसह ‘पोकरा’ प्रकल्पांतर्गत बनावट दस्तऐवज तयार करून तुषार सिंचन व ठिबक संच वितरणात शासनाची ६ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दोन कृषी पर्यवेक्षकांसह सहा कृषी सहायकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात अखेर विभागीय कृषी सहसंचालकांनी ६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तर दोन कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Employee Suspension
Gramsevak Suspension : ग्रामसेवकांवर निलंबनाची टांगती तलवार

विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी २७ मे रोजी कृषी पर्यवेक्षक रोहिणी पवार, आर. पी. जाधव, कृषी सहायक एस. बी. बनसोडे, एस. व्ही. दबडे, आर. एस. पाटणकर, आर. जे. चव्हाण, एस. एच. कचलकवार, एच. पी. नव्हारे यांना निलंबित केले आहे.

तर मंडळ कृषी अधिकारी आर. जे. मरदोडे व जे. डी. पवार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. यातील कृषी पर्यवेक्षक एम. बी. बेस हे सेवानिवृत्त झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com