Seed Quality Control : बियाण्यांचे नमुने अप्रमाणित आढळल्यास विक्रीवर बंदी

Seed Sample Test : पेरणीपूर्वी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांतून-खते, बियाणे, कीटकनाशकांचे नमुने गोळा करण्यात येणार असून त्याची शासकीय प्रयोगशाळांत चाचणी होणार आहे.
Summer Sowing
Summer SowingAgrowon
Published on
Updated on

Nashik News : सिन्नर तालुक्यातील खरीप पेरणीपूर्वीच कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. पेरणीपूर्वी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांतून-खते, बियाणे, कीटकनाशकांचे नमुने गोळा करण्यात येणार असून त्याची शासकीय प्रयोगशाळांत चाचणी होणार आहे. हे नमुने अप्रमाणित असल्याचे आढळल्यास त्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे.

तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत हे नमुने गोळा केले जाणार आहेत. याबाबत कृषी सेवा केंद्र संचालकांच्या बैठकीतही इशारा देण्यात आला. कृषिमंत्र्यांच्या तालुक्यात सक्रिय झालेल्या कृषी विभागाने हा इशारा दिला. सिन्नर येथे खरीप हंगाम तयारीच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाची बैठक झाली. त्यात हा इशारा देण्यात आला.

Summer Sowing
Cotton Seeds : जळगाव जिल्ह्यात अवैध कापूस बियाण्याप्रकरणी कारवाई सत्र

जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, वजन व मापे निरीक्षक संजय वाघ, पंचायत समिती कृषी अधिकारी नंदकुमार अहिरे, इफको कंपनीचे निमिष पवार, मच्छिंद्र कांगणे, सुधाकर देशमुख, विस्तार अधिकारी दीपाली मोकळ आदींनी कृषी सेवा संचालकांना मार्गदर्शन केले.

Summer Sowing
Seed Fertilizer prices : शेतकऱ्यांना बियाणे, कीडनाशके योग्य दरात उपलब्ध करून द्या

तालुक्यासाठी १६ हजार ८०० टन खतांचे नियोजन असून तालुक्यात खरिपाचे ६९ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे. बाजरी, मका, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, कापूस, तूर, मूग, उडीद व इतर पिकांचे खरीप हंगामात पेरणीचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. खरीप हंगामासाठी पाच हजार टन युरिया, दोन हजार २०० टन एसएसपी, २०० टन एमओपी, एक हजार ५०० टन डीएपी तर सात हजार ९०० टन संयुक्त खते असे एकूण १६ हजार ८०० टन खतांचे नियोजन करण्यात आले आहे.

नर्सरीधारकांना विक्री परवाना बंधनकारक

रोपांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी असल्याने भाजीपाला रोपे विक्रीसाठी नर्सरीधारकांना विक्री परवाना बंधनकारक केलेला आहे. परवाना घेतल्याशिवाय रोपांची विक्री केल्यास कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. रोपे खरेदीची परिपूर्ण पावती देणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ग्राहक मंचाकडे भरपाईसाठी दाद मागणे शक्य होते.

बियाणे, खते, कीटकनाशके कायद्याचे तंतोतंत पालन करावे. जादा दराने विक्री करणे, लिंकिंग न करणे, विक्री केंद्रात खते शिल्लक असूनही खते न देणे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. तसेच ई-पीओएस मशिनद्वारेच विक्री करावी.
- नंदकुमार अहिरे, कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com