Poultry Vaccine : पोल्ट्रीच्या तीन रोगांवर आता एकच लस; कोणत्या रोगांवर ठरणार प्रभावी?

Poultry Diseases : या लसीमुळे बर्सल, न्यूकॅसल आणि मॅरेक्स या रोगांचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवता येतं. या तिन्ही रोगांमुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. कोंबड्यांना वेळोवेळी लसीकरण करावे लागते. त्यामुळे खर्च आणि कष्टात वाढ होते.
Poultry Vaccine
Poultry VaccineAgrowon
Published on
Updated on

Boehringer Ingelheim: भारतीय पोल्ट्रीच्या तीन रोगांवर प्रभावी एकच लस आंतराष्ट्रीय औषध कंपनी बोहरिंगर इंगेलहाइमने लॉन्च केली आहे. या लसीमुळे भारतीय पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

या लसीमुळे बर्सल, न्यूकॅसल आणि मॅरेक्स या रोगांचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवता येतं. या तिन्ही रोगांमुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. कोंबड्यांना वेळोवेळी लसीकरण करावे लागते. त्यामुळे खर्च आणि कष्टात वाढ होते.

परंतु आता मात्र एकाच वेळी लस दिल्याने वारंवार लस देण्याची गरज नाही. ही लस पिलं उबवताना दिले असून पुढील काळात लस देण्याची गरज नाही. तसेच या लसीमुळे शेतकऱ्यांची वेळ, कष्ट आणि खर्चात बचत होत असून पक्ष्यांवरील ताणही कमी होतो, असाही कंपनीने दावा केला आहे.

Poultry Vaccine
Poultry Industry: भारतातील पोल्ट्री उद्योग निर्णायक वळणावर

बर्सलची लागण झालेल्या कोंबड्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. पिलांची वाढ थांबून मृत्यूदरही वाढतो. तर न्यूकॅसल संसर्गजन्य रोग असून श्वासोच्छवास व पचनसंस्थेवर हल्ला करतो. त्यामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचा दर खूप जास्त आहे. मॅरेक्स विषाणूजन्य रोग आहे. यामध्ये कोंबड्यांच्या मज्जासंस्थेला व त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे कोंबड्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो.

बोहरिंगर इंगेलहाइमचे राष्ट्रीय पशुधन आरोग्य प्रमुख डॉ. विनोद गोपाळ यांनी लस विज्ञानाधारित असल्याचं सांगितलं. "भारतीय शेतकऱ्यांवर उत्पादन टिकवण्याचा आणि रोग नियंत्रणाचा ताण असतो. परंतु ही लस म्हणजे विज्ञानाधारित आणि शेतकरी केंद्रित उपाय आहे. या लसीमुळे पक्ष्यांचं आरोग्य, उत्पादकता आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न तिन्ही वाढतील." असा दावा डॉ. गोपाळ यांनी केला आहे.

दरम्यान, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा अंडी उत्पादक आहे. तसेच जगातील पाचव्या क्रमांकाचा चिकन उत्पादन देश असून दैनंदिन अंड्याचा खप ३० कोटींहून अधिक आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांची अंडी उत्पादनात आघाडी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com