Wadaj Dam: वडज धरणाची क्षमता गाळामुळे घटली; शेतकऱ्यांची त्वरित खोलीकरणाची मागणी

Wadaj Dam Silt Problem: वडज धरणातील गाळामुळे साठवण क्षमता निम्म्याने घटली असून, प्रत्यक्षात केवळ ६०-७०% पाणी साठा उपलब्ध आहे. यामुळे धरणाचे खोलीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Wadaj Dam
Wadaj Dam Agrowon
Published on
Updated on

Junnar News : कुकडी प्रकल्पातील वडज धरणाची पाणी साठवण क्षमता साचलेल्या गाळामुळे निम्मी झाली आहे. येत्या उन्हाळ्यात तरी गाळ काढला जाईल, अशी अपेक्षा मीना खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भारतीय किसान संघाने व्यक्त केली आहे.

जुन्नर तालुक्यातील मीना नदीवर वडज येथे १९८० मध्ये मातीच्या धरणाचे बांधकाम झाले. या धरणाची क्षमता एक टीएमसी इतकी असून वर्षानुवर्षे पावसाळ्यात वाहत्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ माती, दगड, वाळू वाहून आल्याने धरणाची साठवण क्षमता कमी कमी होत चालली आहे. कागदावर धरण १०० टक्के भरते. पण, प्रत्यक्षात पाणी साठा ६०-७० टक्केच होत आहे. यामुळे गाळ, माती काढून धरणाचे खोलीकरण आवश्यक झाले आहे.

Wadaj Dam
Jayakwadi Dam Water Rotation : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा : जायकवाडीतून पहिले उन्हाळी आवर्तन सुरू

नैसर्गिक कोणत्याही धरणाचा कालावधी हा पन्नास वर्षाचा असतो. यामुळे येत्या उन्हाळ्यात तरी गाळ काढण्यात यावा, यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आग्रही असून मदत करण्यास तयार आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीची शासन दरबारी कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. संबंधित अधिकारी प्रतिसाद देत नाहीत, अशी खंत जुन्नर तालुका भारतीय किसान संघाचे युवा अध्यक्ष प्रशांत पाबळे यांनी व्यक्त केली आहे.

वडज धरणातील बरचसे पाणी खाली जाते. पिण्याच्या पाण्यासाठी वडज धरणावर बारव, येणेरे, पारुंडे, सावरगाव,  अशी अनेक छोटी-मोठी दीडशेहून अधिक गावे अवलंबून आहेत. प्रस्तावित वडज उपसा सिंचन योजना सुद्धा याच धरणातून करण्यात येणार आहे.

Wadaj Dam
Slit Remove : ‘हरणबारी’तून गाळ काढण्यास प्रारंभ

या सगळ्याचा विचार करता वडज धरणामधून तत्काळ गाळ काढणे गरजेचे आहे. शेतीसाठी देखील गाळ मातीचा वापर होऊ शकणार आहे. त्यामुळे वडज धरण गाळमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी पाबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.

भविष्यातील गरज लक्षात घ्यावी

वडज धरण क्षेत्रातील वडज, येणेरे, कुसूर, निरगुडे, बुचकेवाडी, गुंजाळवाडी, आर्वी, निमगावतर्फे म्हाळुंगे आदी गावच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची भविष्यातील गरज लक्षात घ्यावी आणि धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com