Sant Namdev Maharaj : नर्सी येथे संत नामदेव महाराज यांचा ७५३ वा जन्मोत्सव सोहळा साजरा

Namdev Maharaj Jayanti : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सकाळी ६ वाजता श्रींच्या वस्त्र समाधीची महापूजा व अभिषेक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, तहसीलदार तथा संस्थानचे अध्यक्ष नवनाथ वगवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
Sant Namdev Maharaj Jayanti
Sant Namdev Maharaj JayantiAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : राष्ट्रीय संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथे कार्तिक प्रबोधिनी एकादशीला गुरुवारी (ता. २३) सकाळी ६:१० वाजता संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात व पणत्या पेटवून दीपोत्सवाने साजरा करण्यात आला.

सकाळी नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंती सोहळ्यानिमित्त नामदेव मंदिर संस्थान व परिसरातील भाविकांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सकाळी ६ वाजता श्रींच्या वस्त्र समाधीची महापूजा व अभिषेक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, तहसीलदार तथा संस्थानचे अध्यक्ष नवनाथ वगवाड यांच्या हस्ते करण्यात आला.

Sant Namdev Maharaj Jayanti
Agriculture Technology : शाश्‍वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व

या वेळी संस्थानचे सचिव व्दारकादास सारडा, उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, राहुल नाईक, मनोज आखरे, ब्रिजगोपाल तौष्णीवाल, रमेश मगर, अंबादास गाडे, डॉ. विठ्ठल रोडगे नर्सीसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(ॲग्रो विशेष)

Sant Namdev Maharaj Jayanti
Agriculture Industry : शेतीस उद्योगाचा दर्जा देण्यास शासन प्रयत्नशील

संत नामदेव महाराज यांच्या जन्मसोहळा साजरा करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळ पासूनच मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. सकाळी मंदिर परिसरात तसेच घाट परिसरात शेकडो पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.

मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने मंदिराचा परिसर रोषणाईने उजळून निघाला होता. जन्मोत्सवानिमित्त आरती, भजन कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम संस्थानच्या वतीने घेण्यात आले. या वेळी संत नामदेव जन्मोत्सव सोहळ्याला नर्सी व पंचक्रोशीतील हजारो भाविक सोहळ्यात सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com