Solapur APMC Election : भाजपच्या वरिष्ठांपुढेच तिढा सुटण्याची शक्यता

APMC Election Update : राज्यात असलेली भाजपची सत्ता, भाजपने निवडणुकीच्या अगोदरच सर्वांना दाखविलेले राष्ट्रीय बाजारचे अस्त्र यामुळे या निवडणुकीत भाजपचे नेते सांगतील तीच पूर्व दिशा ठरण्याची शक्यता आहे.
Solapur APMC
Solapur APMC Agrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ४२९ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दाखल केलेल्या अर्जामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख यांची माणसं कोण आणि माजी आमदार दिलीप माने यांची माणसं कोण? याचा कसून शोध घेतला जात आहे. दोन पॅनेलला सर्वच्या सर्व जागांवर सक्षम उमेदवार मिळतील, अशी स्थिती प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. उमेदवारीचा अंतिम निर्णय भाजपची राज्य पातळीवरील श्रेष्ठीच घेण्याची शक्यता आहे.

राज्यात असलेली भाजपची सत्ता, भाजपने निवडणुकीच्या अगोदरच सर्वांना दाखविलेले राष्ट्रीय बाजारचे अस्त्र यामुळे या निवडणुकीत भाजपचे नेते सांगतील तीच पूर्व दिशा ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांची भूमिका निर्णायक मानली जात आहे.

Solapur APMC
Solapur APMC Election : सोलापूर बाजार समिती निवडणुकीपूर्वी कल्याणशेट्टी तोंडघशी

भाजपच्या या दोन्ही आमदारांना माजी आमदार दिलीप माने हे चालतील का? या प्रश्‍नाच्या उत्तरावर बाजार समितीच्या निवडणुकीची चुरस अवलंबून आहे. भाजपसोबतच राज्यातील महायुतीलमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेलाही बाजार समितीच्या सत्तेत वाटा मिळला जाण्याची शक्यता आहे. बाजार समितीच्या राजकारणात आतापर्यंत काँग्रेसची भूमिका निर्णायक राहिली होती.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून काँग्रेसमध्ये झालेला गोंधळ, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीकडे केलेले दुर्लक्ष, यामुळे काँग्रेसमध्ये शांतता दिसते.

Solapur APMC
Solapur APMC Election : सोलापूर बाजार समितीसाठी तब्बल ४२९ जणांचे ४६९ अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांना बाजार समितीत संधी मिळण्याची शक्यता आहे. साठे-वानकर यांच्याकडे असलेली ताकद व सर्वपक्षीय वैयक्तिक संबंधांमुळे त्यांचा बाजार समितीत प्रवेश निश्‍चित मानला जात आहे.

मंगळवारनंतर वाढणार हालचाली

दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी मंगळवारी (ता. १) होणार आहे. छाननीमध्ये अनेक अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे. अर्ज अपात्र ठरल्याने इच्छुकांची संख्या, मनधरणी करावी लागणाऱ्या उमेदवारांची संख्या आपोआपच घटणार आहे. छाननीत अर्ज वैध ठरलेले उमेदवार स्पष्ट झाल्यानंतर बाजार समितीच्या राजकीय घडामोडींना खऱ्या अर्थाने वेग येण्याची शक्यता आहे. यंदाच्या बाजार समिती निवडणुकीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भूमिका महत्त्वाची व निर्णायक मानली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com