Water Stock Update : नांदेडमध्ये पाऊस लांबल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट

Nanded Rain News : सध्या एकूण १०४ प्रकल्पात २०३.३९ दशलक्ष घनमीटरनुसार २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
Water Shortage Issue
Water Shortage IssueAgrowon
Published on
Updated on

Nanded Water Shortage News : नांदेड जिल्ह्यात जून महिना संपत येऊनही पावसाचे आगमन झाले नसल्याने प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. मध्यम तसेच लघू प्रकल्पातील पाणी तळाला गेले आहे. तर नांदेड पाटबंधारे मंडळातील सिद्धेश्‍वर प्रकल्प कोरडा पडला आहे.

सध्या एकूण १०४ प्रकल्पात २०३.३९ दशलक्ष घनमीटरनुसार २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

जून महिना संपत आला आहे. असे असले तरी पावसाचे मात्र अद्याप आगमन झाले नाही. मागील चार-पाच दिवसांपासून केवळ भुरभुर असल्याने शेतकऱ्यांना अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील धरणसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे.

यातही ८० प्रकल्प असलेल्या लघू प्रकल्पात तसेच नऊ प्रकल्प असलेल्या मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला आहे. सध्या जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात ३३.६६ दलघमीनुसार ४१.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ४५.०४ दलघमीनुसार ३२.५४ टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांत २७.७४ दलघमीनुसार १९.९५ टक्के पाणीसाठा आहे.

Water Shortage Issue
Water Shortage : पेण तालुक्यातील खारेपाट पावसाळ्यातही तहानलेलाच

चार कोल्हापुरी बंधाऱ्यांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. ८० लघू प्रकल्पांत २८.७२ दलघमीनुसार १६.६२ टक्के पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ६८.२२ दलघमीनुसार ३५.९४ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पात २०३.३९ दशलक्ष घनमीटरनुसार २७.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ४५३.५१ दलघमीनुसार ५६.०० टक्के पाणीसाठा आहे. तर सिद्धेश्‍वर प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा संपल्याने सध्या यात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ४०७.०९ दलघमीनुसार ४२.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

नांदेड पाटबंधारे मंडळातील प्रकल्पनिहाय पाणीसाठा

प्रकल्प - दलघमी - टक्केवारी

विष्णुपुरी - ३३.६६- ४१.६६

मानार - ४५.०४ - ३२.५९

मध्यम प्रकल्प (९) - २७.७४- १९.९५

लघू प्रकल्प (८०)- २८.७२- १६.६२

उच्चपातळी बंधारे (९)- ६८.२२ - ३५.९४

एकूण प्रकल्प १०४- २०३.३९- २७.९३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com