Medicine Shortage : कोप्रोली केंद्रात औषधांचा तुटवडा

Primary Health Centre : उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
Primary Health Centre
Primary Health CentreAgrowon

Uran News : उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून, त्यांना औषधे विकत घ्यावी लागत आहेत. खिशाला कात्री बसत असल्याने रुग्ण त्रस्त झाली आहेत.

गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा व्यवस्थित मिळाव्यात आणि नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सरकारने जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. गोरगरिबांना कोणत्याही प्रकारे त्रासाला सामोरे जावे लागू नये, त्यांच्यावर व्यवस्थित उपचार व्हावे यासाठी आरोग्य विभागाकडून ४०० पेक्षा अधिक प्रकारच्या गोळ्या-औषधांचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरवला जातो.

Primary Health Centre
Health Center : सातारा जिल्ह्यात ६५ आरोग्य केंद्रे अद्ययावत करणार

मात्र, उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक प्रकारच्या गोळ्या-औषधे उपलब्ध नाहीत. काही दिवसांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा बोजवाराही झाला आहे. एकतर डॉक्टरांची कमी त्यात औषधांचा तुटवडा यामुळे परिसरातील गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे.

सध्या औषध उपलब्ध नसल्याने बाहेरून औषधे विकत घ्या, असे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी रुग्णांना सांगत आहेत. आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे मात्र रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

उन्हाळा वाढत असल्याने वातावरणात बदल झाले आहेत. त्यामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासीबांधव व गोरगरिबांचा समावेश आहे. परंतु या शासकीय आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांमध्ये नाराजी आहे. मोफत उपचार मिळावे म्हणून गोरगरीब जनता प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात; मात्र औषधे नसल्याने हजारो रुपयांचे औषध घेण्याचे प्रसंग गोरगरीब जनतेवर येत आहे.

Primary Health Centre
Health Center : आरोग्‍य केंद्रात रुग्‍णांची परवड

अनेकदा औषधे असूनही रुग्ण माघारी

कोप्रोली केंद्रात डॉक्टरांकडून औषधे लिहून दिली जातात; मात्र औषध देणारे कर्मचारी गोळ्या बाहेरून घ्या, असे सांगतात. येथे जखमेवरील औषधे, टीबी, बीपीवरील गोळ्याही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी दहा गोळ्या लिहून दिल्या, तर कर्मचारी फक्त चारच देतात. अनेकदा औषध असूनही नसल्‍याचे कर्मचारी सांगतात.

आमच्याकडून औषध पुरवठा व्यवस्थित केला गेला आहे. मात्र, जर तशी काही परिस्थिती असेल, तर त्याची माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल.
डॉ. मनीषा विखे, कम्युनिटी मेडिसिन, जिल्हा आरोग्य अधिकारी
मोफत उपचार होतात म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात जाते. मात्र, येथे अनेकदा डॉक्टरही नसतात. असले तरी त्यांनी लिहून दिलेली औषधे अनेकदा बाहेरून घ्यायला सांगतात किंवा औषधेच कमी दिली जातात. त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी व्हावी.
मीना रामभाऊ पाटील, रहिवासी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com