Health Center : आरोग्‍य केंद्रात रुग्‍णांची परवड

Health Center Facilities : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील रिक्त पदांमुळे सुधागड तालुक्यातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत.
Health Center
Health Center Agrowon

Pali News : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील रिक्त पदांमुळे सुधागड तालुक्यातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील धनुर्वातावरील इंजेक्शन तसेच खोकल्याची औषधे संपल्‍याची बाब बुधवारी (ता.१४) समोर आली. त्‍यामुळे नाईलाजाने अनेकांना खासगी रुग्‍णालयांत उपचार घ्‍यावे लागले.

जांभूळपाडा आरोग्‍य केंद्रात आजूबाजूच्या गाव-खेड्यातील रुग्‍ण मोठ्या संख्येने येतात. मात्र कधी मनुष्‍यबळाचा अभाव तर कधी औषधे नसल्‍याने रुग्‍णांना हाल सहन करावे लागतात. परिसरातील इम्रान खान दुचाकीवरून पडल्याने त्यांना दुखापत झाल्‍याने ते जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्या नातेवाईकांना धनुर्वातावरील इंजेक्शन संपल्‍याने बाहेरून आणण्यास सांगितले.

Health Center
Health Center : आरोग्य केंद्राअभावी रुग्णांची गैरसोय

सध्या संसर्गजन्य आजार बळावले असून सर्दी खोकल्‍याचे रुग्‍ण वाढले आहेत. मात्र आरोग्‍य केंद्रात खोकल्यावरील औषधे संपल्‍याने रुग्णांना औषधांविनाच परतावे लागत आहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर साधारण ४३,८१० लोकसंख्या अवलंबून आहे. तर जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर साधारण २८,८६१ लोकसंख्या अवलंबून आहे.

सुधागड तालुक्यात साधारण १०० महसुली गावे असून तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. एकीकडे सरकार आरोग्‍य सेवा सुधारण्यावर भर देत आहे, मात्र दुसरीकडे रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, मनुष्‍यबळाअभावी अनेकदा रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे समोर येत आहे.

Health Center
Health Center : सातारा जिल्ह्यात ६५ आरोग्य केंद्रे अद्ययावत करणार

नाईलाजाने खासगी रुग्णालयात उपचार

सध्या डेंगी, मलेरिया, टायफॉईड अशा आजारांची साथ सुधागड तालुक्यात आहे. तालुक्यातील अनेक गावे-पाड्या दुर्गंम भागात असून येथील रुग्‍णांना आरोग्‍य केंद्राचा मोठा आधार असतो. मात्र रिक्‍त पदे, औषधांच्या तुटवड्यामुळे त्‍यांना नाईलाजाने पदरमोड करून खासगी रुग्णालयात उपचार घ्‍यावे लागतात. तर काही वेळा पैशाअभावी उपचारच घेतले जात नसल्‍याच्या घटनाही समोर आल्‍या आहेत.

बाह्य रुग्‍ण विभागात वेळेबाबत मनमानी

तालुक्यातील आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी रुग्णांसोबत सौजन्याने बोलत नाहीत. व्यवस्‍थित न तपासता केवळ विचारपूस करून औषधे दिली जात असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे. बाह्य रुग्‍ण विभागाची (ओपीडी) वेळ निश्‍चित असली तरी अनेकदा वेळ संपल्‍याचे सांगून रुग्‍णांना माघारी पाठवले जात असल्‍याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते कपिल पाटील यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com