NREGA Labor : राज्यात नरेगाच्या कामावर दोन लाख चौतीस हजार मजूर

Labor Update : मजुरांना रोजगार मिळावा यासाठी सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (नरेगा) कामावर राज्यात सध्या सुमारे २ लाख ३४ हजार मजूर काम करत आहेत.
NREGA Labor
NREGA Labor Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : मजुरांना रोजगार मिळावा यासाठी सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (नरेगा) कामावर राज्यात सध्या सुमारे २ लाख ३४ हजार मजूर काम करत आहेत. ९ हजार ३७८ ग्रामपंचायतीत ४० हजार ६९६ कामे सुरू आहेत. दिवाळीनंतर मात्र रोजगार हमीच्या कामावर मजूर वाढतील, असे सांगितले जात आहे.

ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (नरेगा) सिंचन विहिरी, जंगलातील वृक्षलागवड, फळबाग लागवड, रस्ते, गाय गोठे, शेळीपालन निवारे, घरकुले, शेततळे, शेषखड्डे, शाळांना संरक्षणभिंत, ग्रामपंचायत इमारती (ग्रामपंचायत भवन), बचतगट भवन, रोपवाटिका, पेव्हींग ब्लॉक बसवणे यासह सुमारे २६२ प्रकारची विविध कामे कृषी, जलसंधारण, ग्रामपंचायत, वन व अन्य विभागामार्फत केली जातात.

NREGA Labor
Labor Shortage : खानदेशात मजूरटंचाई वाढली

पावसाळ्यात बहुतांश ठिकाणी रोहयोमधील सिंचन विहीरी, शेततळ्याची कामे बंद होती. आता ती सुरू होणार आहेत. राज्यात २८ हजार २७४ ग्रामपंचायती असून सध्या ९ हजार ३७८ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ४० हजार ६९६ कामे सुरू आहेत. या कामांवर २ लाख ३४ हजार ४२१ मजूर काम करत आहेत. रोजगार हमी योजनेच्या कामांवर २७३ रुपये दर दिवसाला मजुरी मिळत असल्याने राज्यात रोज सहा कोटी ३३ लाख रुपये दर दिवसाला मजुरीवर खर्च होत आहेत.

NREGA Labor
Labor Shortage : राजगड तालुक्यात शेतमजुरांची टंचाई

दिवाळीचा काळ असल्याने ‘रोहयो’च्या कामांवर मजुरांची संख्या कमी होती. मात्र दिवाळीनंतर विहीरी, शेततळ्यासह पावसाळ्यामुळे बंद असलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामे सुरू होणार असल्याने साधारण पाच नोव्हेंबरनंतर मजुरांच्या संख्येतही बऱ्यापैकी वाढ होणार असल्याचे ग्रामविकास विभागातून सांगण्यात आले.

जिल्हानिहाय मजूरसंख्या (कंसात कामे)

अहिल्यानगर : ९,१४५ (१३०९), अकोला : ६,२५७ (१४९६), अमरावती : २६४४६ (४९२४), बीड : १०९९० (१०८१), भंडारा : ३१८७ (५१९) बुलडाणा : ३८४५ (७४७), चंद्रपूर : १०७३१ (२००१), छत्रपती संभाजीनगर : १६९६४ (२१८९), धाराशीव : १७६६ (२००), धुळे : ९९२२ (१५४२), गडचिरोली : ४७०९ (८०१), गोंदिया : १०२७४ (१७६१), हिंगोली : ४६७५ (३२०), जळगाव : १००९४ (१५९४), जालना : १५१७१ (१४०१), कोल्हापुर : १९५२ (३०३), लातुर : ५८४७ (७८१), नागपूर : ५०७३ (१३८३), नांदेड : ११९६२ (१६३५), नंदुरबार : ११८५६ (३९४५), नाशिक : ८७४१ (१८९८), पालघर : ४५४४ (९३५), परभणी : ६००७ (८०४), पुणे : १९८६ (३७५), रायगड : ९६३ (३२७), रत्नागिरी : १८३९ (६२३), सांगली : २८४८ (३९३), सातारा : २९८३ (५२४), सिंधुदुर्ग : ११८१ (४४१), सोलापूर : ६०५९ (८६०), ठाणे : १२२९ (३९९), वर्धा : २९३७ (७६३), वाशीम : २७४७ (५४४), यवतमाळ : ९४९१ (१८७८)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com