Modi 3.O : शिवराजसिंग चौहान नवे केंद्रीय कृषिमंत्री तर पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य मंत्रालय कायम

अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालय तर निर्मला सितारमन यांच्याकडे अर्थ मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे.
Shivraj singh Chauhan
Shivraj singh ChauhanAgrowon
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील मंत्रिमंडळात खातेवाटप करण्यात आली आहे. शिवराज सिंग चौहान यांच्याकडे केंद्रिय कृषिमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य मंत्री पदाची कायम ठेवण्यात आली आहे. तसेच निर्मला सीतारमन यांच्याकडील अर्थ मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता.९) सरकार स्थापन झालं. राष्ट्रपती भवनात ७२ मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यामुळे कुणाकडे कोणतं खातं जाणार याबद्दल चर्चा रंगली होती.

कुणाकडे कोणतं खातं?

जुन्या मंत्रिमंडळातील काही कॅबिनेट मंत्र्यांना डिच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्याची वर्णी लागली आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, रस्ते व वाहतूक नितीन गडकरी, नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, भूपेंदर यादव पर्यावरण, जे पी नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय, तर सी आर पाटील जलशक्ती, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री, अर्जुन मेघवाल कायदा मंत्री, चिराग पासवान क्रीडा व अन्न प्रक्रिया मंत्री, जतीन राम मांझी एमएसएमई मंत्रालय, अन्नपूर्णा देवी महिला व बालविकास, प्रल्हाद जोशी ग्राहक कल्याण, गिरीराज सिंह वस्त्रोद्योग, ज्योतिरादित्य सिंदीया सूचना प्रसारण, हरदीप सिंह पुरी पेट्रोलियम, एचडी कुमारस्वामी अवजड उद्योग, किरण रिजीजू संसदीय कार्यमंत्री तर सर्वानंद सोनोवाल यांच्यावर पोर्ट आणि शिपिंग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तसेच मनोहरलाल खट्टर यांच्याकडे ऊर्जा, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राजीव राजन सिंह पंचायत राज मंत्रालय, वीरेंद्र कुमार सामाजिक न्याय, ज्यूअल ओराम आदिवासी विकास, गजेंद्रसिंह शेखावत सांस्कृतिक व पर्यटन, तर किशन रेड्डी यांच्याकडे कोळसा व खाणकाम मंत्रालय सोपवण्यात आलं आहे.

राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार)

प्रतापराव जाधव आयुष मंत्रालय, राव इंद्रजित सिंह नियोजन सांख्यिकी कार्यक्रम, जितेंद्र सिंह यांच्याकडे विज्ञान, तंत्रज्ञान व पंतप्रधान कार्यालय तसेच अर्जुन राम मोघवाल कायदा व न्याय मंत्रालय तर जयंत चौधरी कौशल्य विकास मंत्रालय देण्यात आलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com