
Pune News : देशातील निवडक सहकारी साखर कारखान्यांमध्ये नावाजलेल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या (निवृत्तीनगर, शिरोली, ता. जुन्नर) पंचवार्षिक निवडणुकीत संचालकांच्या २१ पैकी चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनेलचे चारही उमेदवार रविवारी (ता. १६) झालेल्या मतमोजणीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यामुळे ‘विघ्नहर’वर शेरकर यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
उत्पादक मतदार संघांच्या शिरोली गटाच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली. यात शिवनेर पॅनेलचे विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर (१०,४२३), सुधीर खोकराळे (१०,०५७) व संतोष खैरे (१०,०२५) मते मिळवून विजयी झाले. त्यांच्या विरोधात रहेमान इनामदार यांना अवघी (३४९) मते मिळाली. एकूण मते - ३१,८५१, वैध मते - ३०,८५४ व ९९७ मते अवैद्य ठरली.
इतर मागासवर्गीय मतदार संघाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार होते. यामध्ये सुरेश गडगे (९,९२०) विंजयी झाले. तर नीलेश भुजबळ यांना अवघी २२१ व रहेमान इनामदार यांना अवघी ११६ मते मिळाली. एकूण मते १०,६१७, वैध मते - १०,२५७, तर ३६० मते अवैध ठरली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. मतमोजणीसाठी तहसीलदार डॉ. सुनील शेळके, सचिन मुंढे, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सचिव अरुण थोरवे तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बिनविरोध घोषित करण्यात आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :
उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघ जुन्नर गट (तीन जागा) : देवेंद्र खिलारी, अशोक घोलप, अविनाश पुंडे
ओतूर गट (चार जागा) : बाळासाहेब घुले, धनंजय डुंबरे, पंकज वामन, रामदास वेठेकर
पिंपळवंडी गट (तीन जागा) : विवेक काकडे, प्रकाश जाधव, विलास दांगट
घोडेगाव गट (तीन जागा) : यशराज काळे, दत्तात्रेय थोरात, नामदेव थोरात
अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ (एक जागा) : प्रकाश सरोगदे
भटक्या-विमुक्त जाती-जमाती मतदार संघ (एक जागा) : संजय खेडकर
महिला राखीव (दोन जागा) ः नीलम तांबे, पल्लवी डोके
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.