Sugar Factory Election
Sugar Factory ElectionAgrowon

Sugar Factory Election : ‘विघ्नहर’च्या चार जागांसाठी आज मतदान

Cooperative Election : निवृत्तीनगर (धालेवाडी, ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या चार जागांसाठी शनिवारी (ता. १५) मतदान होणार आहे.
Published on

Pune News : निवृत्तीनगर (धालेवाडी, ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या चार जागांसाठी शनिवारी (ता. १५) मतदान होणार आहे. शिरोली बुद्रुक येथील श्री. निवृत्तीशेठ शेरकर सांस्कृतिक भवन येथे रविवारी (ता. १६) मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.

संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध झाल्या असून, चार जागांसाठी एकूण पाच मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी उत्पादक मतदारसंघाच्या जुन्नर (३), शिरोली बुद्रुक (५), ओतूर (३), पिंपळवंडी (७), घोडेगाव (२) या चार गटांत एकूण २० मतदान केंद्रे आहेत. जुन्नर गटात- २७९०, शिरोली बुद्रुक - ४५९२, ओतूर - ३४३९, पिंपळवंडी - ६७४७ व घोडेगाव - २०५९ असे १९ हजार ६२७ मतदार आहेत.

Sugar Factory Election
Vighnahar Sugar Factory Elections: ‘विघ्नहर’च्या चार जागांसाठी निवडणूक; १७ जागा बिनविरोध!

मतदान साहित्याचे वाटप शुक्रवारी (ता. १४) सकाळी सुरू करण्यात आले. शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदान केंद्रावर एक पोलिस निरीक्षक, सात अधिकारी व ३१ पोलिस कर्मचारी असे ४० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी कक्षामध्ये मतमोजणी ओळखपत्र आवश्यक असणार आहे. मतमोजणी कक्षामध्ये २० टेबलांवर सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरू होणार असून, अंतिम निकाल दुपारी १२ पर्यंत येणे अपेक्षित आहे.

Sugar Factory Election
Sugar Factory Election : करमाळ्यातील आदिनाथ साखर कारखान्याची निवडणूक जाहीर

संचालक मंडळावर पाच नवीन चेहरे

बिनविरोध निवड झालेले अविनाश पुंडे, बाळासाहेब घुले, पंकज वामन, रामदास वेठेकर, संजय खेडकर हे नवीन चेहरे आहेत.

विद्यमान अध्यक्ष रिंगणात

अध्यक्ष सत्यशील शेरकर व संचालक संतोष खैरे निवडणूक रिंगणात आहेत. माजी संचालक प्रकाश जाधव, विलास दांगट बिनविरोध झाले आहेत, तर सुरेश गडगे निवडणूक रिंगणात आहेत.

शिवनेर पॅनेलचे वर्चस्व

विघ्नहर साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनेलच्या १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर चार जागांसाठी निवडणूक होत आहे. उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदारसंघाच्या शिरोली बुद्रुक गटातील तीन जागांसाठी चार उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

यात शिवनेर पॅनेलकडून विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर, संचालक संतोष खैरे, तसेच सुधीर खोकराळे उमेदवार असून, त्यांच्या विरोधात रहेमान इनामदार निवडणूक रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातील एका जागेसाठी शिवनेर पॅनेलकडून माजी संचालक सुरेश गडगे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात रहेमान इनामदार व नीलेश भुजबळ हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

दहा विद्यमान संचालकांना संधी

विद्यमान उपाध्यक्ष अशोक घोलप, देवेंद्र खिलारी, धनंजय डुंबरे, विवेक काकडे, यशराज काळे, नामदेव थोरात, दत्तात्रेय थोरात, प्रकाश सरोगदे, नीलम तांबे, पल्लवी डोके यांची बिनविरोध निवड झाल्याने या विद्यमान संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com