Shiv Rajyabhishek 2024 : शिवभक्तांच्या अलोट गर्दीत रंगला शिवराज्याभिषेक सोहळा

Rajyabhishek ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj : देशभरातील लाखो शिवभक्तांच्या अलोट गर्दीत दुर्गराज रायगड गजबजून गेला. शिवरायांना त्रिवार वंदन करत गुरुवारी (ता. ६) येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला.
Rajyabhishek ceremony
Rajyabhishek ceremony Agrowon

Rajgad News : देशभरातील लाखो शिवभक्तांच्या अलोट गर्दीत दुर्गराज रायगड गजबजून गेला. शिवरायांना त्रिवार वंदन करत गुरुवारी (ता. ६) येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. साडेतीनशेव्या सोहळ्याचे औचित्य साधून हा सोहळा आंतरराष्ट्रीय करण्याचा निर्धार लाखो शिवभक्तांनी केला.

युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती, युवराद्यनी संयोगिता राजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य सोहळा झाला. मेघडंबरी येथील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ट पुतळ्यावर नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. मंत्रोच्चारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्सव मूर्तीवर संभाजीराजे, शहाजीराजे, संयोगीता राजे यांच्या हस्ते जल, दुग्धाभिषेक करण्यात आला.

Rajyabhishek ceremony
Chhatrapati Shivaji Maharaj statue : नागपुरात उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांत भव्य पुतळा

शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर पोलिसांकडून महाराष्ट्र गीताची धून वाजवत मानवंदना देण्यात आली. मुख्य समारंभानंतर शिवरायांच्या पालखीची राजसदरेपासून जगदीश्वर मंदिर ते शिवसमाधी अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हेलिकॉप्टरद्वारे शिवराज्याभिषेक स्थळी पुष्पवृष्टी करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी सात वाजता शहाजीराजे यांच्या हस्ते नगारखाना येथे ध्वजपूजन व ध्वजवंदन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

Rajyabhishek ceremony
Shiv Rajyabhishek Sohala 2024 : रायगडावर आज होणार शिवराज्याभिषेक सोहळा

साडेसात वाजल्यापासून राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम झाले. यानंतर पालखी राजसदरेवर आणण्यात आली. गडापासून पाच किलोमीटर अगोदरच दुचाकी व चार चाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था केली होती. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर, आमदार रोहित पवार, मनोज जरांगे पाटील, अनिकेत तटकरे, आमदार मंगेश चव्हाण, खासदार ओमराजे निंबाळकर आदी उपस्थित होते.

गड-किल्ल्यांसाठी दोन हजार कोटींची मागणी

राज्याभिषेक सोहळ्यानंतर शिवभक्तांशी संवाद साधताना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य शासनाकडे गड-किल्ल्यांसाठी दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली. ही मागणी पुढील पाच वर्षांसाठी आहे. ‘‘रक्कम कधी देणार हे सरकारने सांगावे. दिलेल्या वेळेपर्यंत रक्कम मिळाली नाही तर आम्ही रायगडावरून उतरणार नाही. मला राजकारण करायचे नाही. मी एक शिवभक्त आहे. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे हे माझ्या आयुष्यातील स्वप्न आहे. पुढील टप्प्यात हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल. या सोहळ्यात बाहेरील देशाचे राजदूत सहभागी होतील,’’ असे संभाजीराजे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com