Nashik APMC
Nashik APMC Agrowon

Nashik APMC News : निवडणुकीच्या तोंडावर माजी सभापती विरुद्ध पकड वॉरंट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऑगस्ट २०१९ मध्ये ई-नाम योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून तीन लाख स्वीकारल्याप्रकरणी माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर खटला सुरू आहे.

Nashik News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऑगस्ट २०१९ मध्ये ई-नाम योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून तीन लाख स्वीकारल्याप्रकरणी माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर खटला सुरू आहे.

मात्र चुंभळे यांना न्यायालयात हजर करण्यासाठी पकड वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, आता ऐन बाजार समिती निवडणुकीच्या (APMC Election) काळातच चुंभळे यांना पकड वॉरंट आल्याने चुंभळे गटाला धक्का बसला आहे. तर विरोधकांकडून निवडणुकीमुळे अपप्रचार होत असल्याचे चुंभळे यांचे म्हणणे आहे.

नाशिक बाजार समितीचा ई-नाम योजनेत समावेश झाल्याने दहा कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले. मात्र या योजनेतील पाच कर्मचाऱ्यांना काही कारणास्तव काढून टाकण्यात आले. कामावर पुन्हा रुजू होण्यासाठी राहुल थोरात यांनी सभापती चुंभळे यांना रुजू करून घेण्याची विनंती केली.

चुंभळे यांनी त्यांच्याकडे अंदाजे दहा लाख रुपये लाचेची मागणी केली. यात तडजोड होऊन सुरुवातीस तीन लाख रुपये देण्याचे ठरले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १६ ऑगस्ट २०१९ ला माजी सभापती शिवाजी चुंभळे तीन लाखांची लाच घेताना पकडले.

Nashik APMC
Nagar APMC Election : नगर बाजार समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी

या प्रकरणी जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. ए. शिंदे यांच्या न्यायालयात विशेष खटला सुरू आहे. शनिवारी (ता. १५) चुंभळे यांच्या नावे पकड वॉरंट जारी करण्यात आले असून, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना आदेश देण्यात आले आहे. यात म्हटले आहे, की शिवाजी चुंभळे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक संशोधन अधिनियम २०१८चे कलम ७ प्रमाणे अपराधाचा आरोप आला आहे.

त्यापेक्षा तुम्ही सदरहू संशयितास माझे पुढे आणावे, तुम्हास या वॉरंटद्वारे हुकूम केला आहे. यात लिहिल्याप्रमाणे चूक होऊ नये. तसेच सदरहू संशयितास पुढील तारीख २६ जूनला माझ्यापुढे हजर राहतील, या बाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी.

तसेच आपण स्वतः पाच हजार रुपये रकमेचे तारण लिहून द्यावे व पाच हजार रुपयांचा एक जामीन दिल्यास यांना सोडून द्यावे, असे आदेशात नमूद केले आहे.

Nashik APMC
Yavatmal Apmc Election : यवतमाळ जिल्ह्यातील १३९ उमेदवारांचे अर्ज बाद

विरोधकांकडून निवडणुकीमुळे अपप्रचार : चुंभळे

विरोधक बाजार समिती निवडणुकीच्या तोंडावर अपप्रचार करत असल्याचा आरोप चुंभळे यांनी केला आहे. मध्यंतरीच्या काळात माझ्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे तारखांना हजर राहता आले नाही.

निवडणुकीच्या तोंडावर विरोधक फायदा उचलत असून, हा त्यांचा स्टंट असून, याच प्रकरणातील फिर्यादी रवी भोये हे देखील निवडणुकीत माझ्यासोबत प्रचार करत आहेत. या प्रकरणाचा विरोधकांकडून बाऊ करण्यात आल्याचे चुंभळे यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com