

Mumbai News : महाराष्ट्रातील ॲग्री टेक कंपनी किसानकनेक्टमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीने गुंतवणुक केल्याची माहीती आहे. पण ही गुंतवणूक नेमकी किती आहे याची माहीती मिळू शकली नाही.
किसानकनेक्ट ही एक ॲग्री टेक कंपनी आहे. महाराष्ट्रात २०२० साली या कंपनीची स्थापना झाली. ही कंपनी शेतीमाल खरेदी आणि विक्रीचे काम करते.
या कंपनीसोबत ५ हजार शेतकरी जोडले गेले आहेत. या शेकऱ्यांकडून गावपातळीवरील खेरदी केंद्रांच्या माध्यमातून शेतीमाल खेरदी करून पुणे आणि मुंबईमधील ग्राहकांना विक्री केली जाते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडे अत्याधुनिक तापमान नियंत्रण आणि तंत्रज्ञानासोबत जोडलेली पुरवठा साखळी आहे. या पुरवठा साखळीमुळे कसानकनेक्ट इतर ई काॅमर्स कंपन्यांपेक्षा वेगळी पडते. कंपनीने शेतीमाल पुरवठा साखर अद्यावत करण्यासाठी विशेष काम केले आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सांगितले की, किसानकनेक्ट ही कंपनी केवळ सुरक्षित अन्नपुरवठा करत नाही. यासोबतच हजारो शेतकऱ्यांना ग्राहकांशी जोडले आहे. किसानकनेक्ट जमिनिचे आरोग्य, पिकांचे आरोग्यावरही काम करत आहे.
तसेच तत्रज्ञानावर आधारित पुरवठा साखळी विकसित केली आहे. किसानकनेक्ट ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्यापर्यंत पोचलेल्या अन्नाची स्त्रोताची माहीती मिळू शकते.
किसानकनेक्टचे संस्थापक विवेक निर्मल म्हणाले की, जमिनिचे आरोग्य राखून उत्पादन घेण्यासाठी आमची कंपनी हजारो शेतकऱ्यांना मदत करत आहे. आमचा १२० कोटींची उलाढाल असून पुणे आणि मुंबईमधील एक लाखापेक्षा अधिक ग्राहकांना आम्ही सेवा देतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.