Health Centre : नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर

Primary Health Centre Shifting Update : प्राथमिक आरोग्य केंद्र हे मसला (खुर्द) (ता. तुळजापूर) येथे स्थलांतरित करण्यास राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने अखेर मान्यता दिली आहे.
Health Centre
Health CentreAgrowon
Published on
Updated on

Naldurg News : शहरालगत उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यामुळे पंधरा पदे मंजूर असलेले व साडेचार दशकांपासून रुग्णसेवा देणारे नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मसला (खुर्द) (ता. तुळजापूर) येथे स्थलांतरित करण्यास राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने अखेर मान्यता दिली आहे.

मात्र, असे असले तरी शहरातील गावठाण व जुनी वस्ती असलेल्या ब्राह्मण गल्ली, गवळी गल्ली, मराठा गल्ली, काझी गल्ली, मोहंमद पनाह गल्ली, भोई गल्ली, किल्ला गेट, कुरेशी गल्ली, साठेनगर, भीमनगर येथील नागरिकांची असुविधा होणार आहे. कारण उपजिल्हा रुग्णालय येथून सरासरी दोन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येथील रुग्णांना पन्नास ते शंभर रुपये रिक्षासाठी खर्च करून उपजिल्हा रुग्णालयात जावे लागणार आहे. त्यापेक्षा नागरिक शहरातील खासगी रुग्णालयात जाणे पसंत करू शकतात. याचा विचार आरोग्य विभागाने करावा व निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Health Centre
Water Tourism Centre : कोयनात होणार आंतरराष्ट्रीय जलपर्यंटन केंद्र

शहरात सध्या स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना खासगी जागेत सुरू आहे. हा दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या शासकीय इमारतीत स्थलांतर करावा, जेणे करून रुग्णांची सुविधा होईल, शासनाचे भाडेही वाचेल व शासकीय मालमत्तेचे संरक्षण होईल; तसेच नागरिकांना चार दशकांपासून सेवा देणाऱ्या या जागेशी असलेले भावनिक नातेही जपले जाईल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Health Centre
Primary Health Centre : किन्हवलीला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या
नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालय सध्या ८० टक्के क्षमतेने सुरू आहे. येथे ट्रॉमा केअर मंजूर झाले आहे. सध्या अधिकारी, कर्मचारी कमी आहेत. काही त्रुटी दूर करून क्षमता विस्तार करण्यात येईल; तसेच आणखी एक आपला दवाखाना शहरासाठी मंजूर झाला आहे.
डॉ. इस्माईल मुल्ला, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, नळदुर्ग

उपजिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे

नळदुर्ग ते तुळजापूर मार्गावरील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात अनेक सुविधा अद्याप सुरू नाहीत. यामध्ये भूलतज्ज्ञ नसल्यामुळे शस्त्रक्रिया होत नाहीत. डॉक्टरसह इतर कर्मचारीसंख्या कमी आहे. इमारतीचे काही काम अद्याप बाकी आहे. यामध्ये अग्निशमन यंत्रणा बसवणे बाकी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com