Shetkari Samruddhi Train : नाशिकला शेतीमाल वाहतुकीसाठी ‘शेतकरी समृद्धी’ विशेष रेल्वे सुरु

Agriculture Good Transportation : देवळाली ते दानापूर असा १,५१५ किमीचा पल्ला
Shetkari Samruddhi Train
Shetkari Samruddhi TrainAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल परराज्यात जाण्यासाठी मध्य रेल्वेने पुन्हा एकदा देवळाली ते दानापूर ही ‘शेतकरी समृद्धी’ विशेष रेल्वे सुरू केली आहे. मंगळवारी (ता. १५) नाशिकमधील देवळाली रेल्वे स्थानक येथून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेचा प्रारंभ केला. या वेळी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाल्या होत्या. तर स्थानकावर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, मंडल रेल व्यवस्थापक इति पाण्डेय यांसह शेतकरी तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

किसान रेल्वे सुरू होऊन ती बंद झाल्यानंतर शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वेगाडी सुरू व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. आता ०११५३ या क्रमांकाची रेल्वे साप्ताहिक ‘शेतकरी समृद्धी स्पेशल रेल्वे’ १९ पासून ९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी १२ वाजता देवळाली येथून सुटेल आणि सोमवारी ३ वाजता दानापूर येथे पोहोचेल. ०११५४ क्रमांकाची साप्ताहिक ‘शेतकरी समृद्धी स्पेशल रेल्वे’ २१ पासून ११ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक सोमवारी १० वाजता दानापूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:३० वाजता मनमाड येथे पोहोचेल. या रेल्वेमध्ये १० पार्सल व्हॅन, १० सामान्य द्वितीय श्रेणी आणि ०३ लगेज सह ब्रेक व्हॅन असतील.

Shetkari Samruddhi Train
E-Samruddhi Platform : शेतीमाल विक्रीसाठी ‘ई-समृद्धी’ प्लॅटफॉर्म

नाशिक भागातून शेतकरी बिहारला शेतीमाल पाठवू शकतील. छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांसाठी पार्सल व्हॅनबरोबरच या ट्रेनमध्ये सामान्य वर्गाचे डबेही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी आणि मजूर दोघांनाही प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. देवळाली ते दानापूर या १,५१५ किमी अंतरावर प्रतिकिमी मालवाहतूक केवळ २८ पैसे प्रति किलोग्रॅमपेक्षा कमी असेल. ज्यामुळे कमी खर्चात नाशिवंत उत्पादनांची वाहतूक करणे शक्य होईल, असे सांगण्यात आले. असे असतील थांबे मनमाड जंक्शन, जळगाव, भुसावळ जंक्शन, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबा असेल. ही मेल एक्सप्रेस म्हणून कार्यरत राहील.

लोडिंगसाठी प्रमुख थांबे

नाशिक : दानापूरपासून अंतर १,५०९ किमी

मनमाड : दानापूरपासून अंतर १,४३६ किमी

भुसावळ : दानापूरपासून अंतर १,२५२ किमी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com