Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Dairy Production Promotion : दुग्धोत्पादन त्यासोबतच शेतीमाल प्रक्रिया तसेच उत्पादित शेतीमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देत देशात विदर्भाला कृषी क्षेत्रातील अग्रेसर प्रदेश म्हणून नावरुपास आणण्याचा मनोदय आहे.
Agro Vision Exhibition Inaguration
Agro Vision Exhibition InagurationAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : दुग्धोत्पादन त्यासोबतच शेतीमाल प्रक्रिया तसेच उत्पादित शेतीमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देत देशात विदर्भाला कृषी क्षेत्रातील अग्रेसर प्रदेश म्हणून नावरुपास आणण्याचा मनोदय आहे.

त्याकरिता कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब वाढावा या उद्देशातून गेल्या १५ वर्षांपासून ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले.

Agro Vision Exhibition Inaguration
International Flower Exhibition : आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन प्रदर्शनास उद्यापासून प्रारंभ

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दाभा येथील मैदानावर आयोजित ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर उद्‌घाटक म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ‘पंदेकृवि’चे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील,

Agro Vision Exhibition Inaguration
Agrowon Exhibition 2024 : तुडये गावचे सतीश पाटील ठरले ड्रोनचे मानकरी

महिंद्रा ट्रॅक्‍टर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम वाघ, संयुक्‍त अरब अमिरात सरकारमधील निर्यात समन्वयक शेख अब्दुल्ला, टाफे ट्रॅक्‍टर्सचे अध्यक्ष श्री. केसवन, डॉ. वाय. जी. प्रसाद, डॉ. सी. डी. मायी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

भाकड गाईंचे सरकार करणार संगोपन

मध्य प्रदेशातील रस्त्यावर फिरणाऱ्या भाकड तसेच मोकाट जनावरांसाठी विशेष गोशाळांची उभारणी सरकार करणार आहे. त्यातील भोपाळ येथे काही लाख गाईंचे संगोपन होईल, अशा गोशाळाचे उद्‌घाटन शनिवारी (ता.२३) केले जाणार असल्याची माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com