Shegaon Pragat Din: शेगावी भक्तांचा महापूर! संत गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात साजरा

Sant Gajanan Maharaj Palakhi Utsav: विदर्भाच्या पंढरीत संत गजानन महाराजांच्या १४७ व्या प्रगटदिनी शेगाव भक्तिमय झाला. हजारो भाविकांनी समाधिस्थळी दर्शन घेतले, तर १००१ दिंड्यांच्या सहभागाने संपूर्ण संत नगरी भक्तिरसात न्हाली.
Shegaon Pragat Din
Shegaon Pragat DinAgrowon
Published on
Updated on

Buldhana News: विदर्भाच्या पंढरीत संत गजानन महाराज यांच्या १४७ व्या प्रगटदिनी हजारोंच्या संख्येत भाविकांनी उपस्थित राहून समाधिस्थळी माथा टेकवला. यंदा शेगावमध्ये प्रगटदिन उत्सवाचा मोठा उत्साह दिसून आला.

प्रगटदिनानिमित्त आलेले भाविक आणि दिंड्यांमध्ये संत गजाननाचा नामघोष सुरू होता. प्रगटदिनासाठी मागील काही दिवसांपासून शेगावात भाविक दाखल व्हायला सुरुवात झाली होती. बुधवारी (ता.१९) रात्रीपासून संत नगरी भाविकांच्या गर्दीने फुलायला लागली होती. यंदा प्रगटदिनाचे औचित्य साधत गजानन महाराज मंदिरात सप्ताहभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले होते.

Shegaon Pragat Din
Shegaon APMC : शेगाव बाजार समितीची उलाढाल पोहोचली १०० कोटींवर

भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर दर्शनासाठी २४ तास सुरू ठेवण्यात आले. यंदा १००० पेक्षा अधिक भजनीदिंड्या दाखल झाल्या होत्या. गेल्या गुरुवारी (ता.१३) सकाळी १० वाजता श्री महारुद्र स्वाहाकार यागाने श्रींचा प्रगट दिन उत्सवाला प्रारंभ झाला होता. दरम्यान, आठवडाभर भक्तिमय व मंगलमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते.

गुरुवारी प्रगटदिनी सकाळी १० वाजता यज्ञयागाची पूर्णाहूती व अवभृतस्नान झाले. त्यानंतर दुपारी ४ वाजता श्रींची पालखी सोहळा अश्‍व, रथ, मेण्यासह, परिक्रमेसाठी श्रींच्या मंदिरातून मार्गस्थ झाला. मंदिर परिसरातील सेवाधारी प्रसादालयाजवळील उत्तर द्वारातून मार्गस्थ झाली. शहरातील विविध भागांतून पालखी सोहळा गेला.

Shegaon Pragat Din
Padalsare Dam Fund : पाडळसरे धरणाच्या निधीवर गदा ; जलसंपदा विभागाला आंदोलनाचा इशारा

या वर्षी मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने दक्षता म्हणून वन-वे एकेरी मार्ग करण्यात आला होता. श्रींच्या समाधीचे दर्शन, मुखदर्शन, महाप्रसाद, पारायण कक्ष, आदी ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

१००१ दिंड्यांचा सहभाग

यंदा श्री प्रगट दिन उत्सवात १००१ दिंड्यांनी सहभाग घेतला. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण १०९ नवीन दिंड्यांना १० टाळ, १ वीणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्‍वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संत वाङ्‍मय आणि श्री माउली पताका वितरित करण्यात आल्या. जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरुस्तीकरिता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरिता सहयोग देण्यात आला. तसेच उत्सवानिमित्त आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजन प्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकूल येथे करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com