Padalsare Dam Fund : पाडळसरे धरणाच्या निधीवर गदा ; जलसंपदा विभागाला आंदोलनाचा इशारा

Nimn Tapi Project : खेडी भोकरी पुलासाठी १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ७५ कोटी व निम्न तापी प्रकल्प पाडळसरेच्या निधीतून ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
Padalsare Dam
Padalsare Dam Agrowon
Published on
Updated on

Amalnaer News : निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा निधी खेडी भोकरी पुलाला देऊ नये, त्यासाठी स्वतंत्र निधी देण्यात यावा, अन्यथा पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा जलसंपदामंत्री गिरीश महाजन व कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, खेडी भोकरी पुलासाठी १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ७५ कोटी व निम्न तापी प्रकल्प पाडळसरेच्या निधीतून ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. निम्न तापी प्रकल्पातून १५ कोटी रुपये आधीच देण्यात आले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून निम्न तापी प्रकल्प रखडलेला आहे. दरवर्षी निधी मिळण्यासाठी मर्यादा येत असल्याने प्रकल्पाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाची किंमत दरवर्षी वाढत जात आहे. निधी इतरत्र वळवल्यास प्रकल्पाच्या कामावर परिणाम होतील. निधीअभावी काम लवकर थांबेल.

Padalsare Dam
Padalse Irrigation Project : पाडळसे निम्न तापी सिंचन प्रकल्प रखडलेलाच

त्यामुळे तालुक्याच्या प्रगतीत बाधा निर्माण होईल. त्याचप्रमाणे पाडळसरेचा निधी इतरत्र खर्च झाल्यास लाभ व्येय गुणोत्तर कमी होईल. दरवर्षी साधारणतः १०० कोटींच्या आसपास निधी मिळाला आहे आणि निधी पुलाला दिल्यास धरण कसे होणार? प्रकल्पाच्या नदीपात्रातील गेटचे काम सुरू आहे, उपसा सिंचन योजनांचे पाईप लाईन टाकण्यात येत आहे. भूसंपादनाची प्रक्रिया अपूर्ण आहे. निधी पुलाला वळता केल्यास समितीतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.

Padalsare Dam
Padalse Irrigation Scheme : पहिल्या टप्प्यात २५ हजार हेक्टर सिंचनाखाली

या निवेदनावर जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, रणजित शिंदे, महेश पाटील, हेमंत भांडारकर, सुनील पाटील, रामराव पवार, सुशील भोईटे आदींच्या सह्या आहेत. तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांनादेखील निवेदन देण्यात आले आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत प्रकल्पाचा समावेश होण्यासाठी प्रकल्पावर किमान ४० टक्के खर्च होणे आवश्यक असल्याने राज्य सरकारकडून निधीची तशी तरतूद करून घेतली आहे. त्यामुळे निधी वळता केल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊन प्रकल्पाची गती मंदावेल. म्हणून खेडी भोकरी पुलास स्वतंत्र निधी बांधकाम विभागाकडून देण्यात यावा.
- अनिल भाईदास पाटील, आमदार तथा माजी मंत्री, अमळनेर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com